रेशमसूत्र
महिला सबलीकरण, उद्योजकता विकास, पर्यावरण संगोपन, ग्रामीण विकास आणि व्यवसाय वृद्धी या सर्व गोष्टी केवळ एकाच व्यवसायातून साध्य केल्या आहेत, दिल्लीच्या कुणाल वैद्य यांनी. जाणून घेऊया रेशमसूत्र या भन्नाट सामाजिक स्टार्टअप बद्दल…
एम डी आय या प्रतिष्ठित एमबीए महाविद्यालयातून आपली एमबीएची पदवी संपादन केल्यानंतर कुणाल यांनी आपला पारिवारिक व्यवसाय नीडल पॉईंट टेक्सटाइल्स ही कंपनी जॉईन केली. व्यवसाय अतिशय सुप्रतिष्ठित व व्यवस्थित बस्तान बसलेला असा होता. या कंपनीकडे केवळ खासगीच नव्हे तर अनेक सरकारी काम देखील घेत असत. आणि त्यात विशेष म्हणजे झारखंड सरकार कडून जगातील एकमेव सर्टिफाइड ऑरगॅनिक सिल्क तयार करणारी एकमेव व कंपनी म्हणून ते प्रमाणित होते. हा व्यवसाय वाढवण्यासाठी कुणाल यांनी अधिकाधिक प्रयत्न व परिश्रम केले आणि आपल्या नव्या पिढीच्या व्यवसायातील संकल्पना त्यांनी चांगल्या पद्धतीने रुजवल्या. आपल्या कंपनीचे संबंधित आपले ग्राहक हे तर आपले दैवत असतातच पण त्यासोबत आपले कामगार कर्मचारी आणि आपले सप्लायर्स की जे आपल्याला कच्चामाल पुरवतात त्यांची देखील काळजी घेणं हे एका कारखानदारांचा आद्यकर्तव्य आहे या विश्वासावर ते सगळ्यांच्याच अगदी आपुलकीने बोलून त्यांची विचारपूस करत.
आपल्या कंपनीतील सर्व लोकांची आपण काळजी घेत आहोतच पण जे दूर खेड्यांमध्ये राहून आपल्या कंपनीसाठी सिल्क म्हणजेच रेशीम धागा पुरवतात त्या लोकांशी मात्र आपला संपर्क नाही असं त्यांच्या लक्षात आलं. आणि म्हणून एके दिवशी त्यांनी खेडोपाडी जाऊन ज्या ज्या खेड्यांमधून आपल्यापर्यंत पोहोचते आहे त्या लोकांची विचारपूस करायची आणि तिथली पाहणी करून घ्यायची असा विचार केला. आणि 2011 मध्ये झारखंड प्रदेशातील शहरापासून फार दूर असलेल्या खेड्यांमध्ये जाऊन त्यांनी अभ्यास करण्यास सुरुवात केली. हे करत असताना तिथे येणाऱ्या मजुरांना काय काय अडचणी येत आहेत याचा देखील ते बारकाईने अभ्यास करत होते.
तेव्हा त्यांचे एक विषय असे लक्षात आला की जे रेशन आपल्यापर्यंत इतक्या सुंदर पद्धतीने पुरवतात ते तयार करण्यासाठी मात्र त्या गावांमधील महिलांना अनेक तास मान आणि पाठ एकत्र करून बसावं लागतं. रेशमी धाग्याचा विणण्याचं काम त्याचे बंडल तयार करण्याचं काम हे सर्व हातांनीच करावा लागतो आणि त्यामुळे तेथील महिलांना त्वचेवर पूर्णपणे त्या धाग्यामुळे कापले गेले च्या खुणा उमटल्या होत्या. रोजच्या अशा पद्धतीच्या बैठ्या कामामुळे अनेक महिलांना पाठीचे व मानेचे आजार जडयाचे समजलं. हे पाहून मात्र कुणालला वाईट वाटले. आणि या महिलांसाठी आपण काय करु शकतो यावर त्याचा विचार चक्र सुरु झालं.
त्याच विचारांमध्ये आपल्या गावी परत आलेले असताना कोणाला आता तो ध्यासच लागला होता. केवळ उत्तम प्रतीचे सिल्क मिळवणे हा एकमेव उद्देश न ठेवता आपण त्या महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे ही तळमळ त्याच्या मनात उत्पन्न झाली. आणि त्यावर अनेक महिने विचार केल्यानंतर आणि अनेक प्रकारचे प्रयोग केल्यानंतर त्याने एक मशीन स्वतः विकसित केले.
2015 मध्ये त्याने अशा पद्धतीचे मशीन पहिल्यांदाच तयार केले. हे मशीन फारच अवजड झाले होते व त्याला चालण्यासाठी विजेची गरज होती परंतु अनेक खेड्यांमध्ये विजेची उपलब्धता नाही असं त्याच्या लक्षात आलं त्यामुळे पुन्हा त्याने नव्याने मेहनत करण्यास सुरुवात केली. आपला नित्यनैमित्तिक व्यवसाय सांभाळून कुणाल नवीन मशीन डिझाइन साठी देखील वेळ काढत होता. आणि अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि एके दिवशी त्याने चक्क सौरऊर्जेवर पाळणारे हलकेफुलके असे मशीन तयार केले. हे मशीन तयार करून त्याचे प्रोटोटाइप तो गावाकडे घेऊन गेला आणि तेथील काही महिलांना प्रायोगिक तत्त्वावर ते वापरण्यासाठी दिले. असे केले असता काहीच महिन्यांमध्ये महिलांकडून त्या मशीनचे फार कौतुक करण्यात आले व त्याची उपयुक्तता हे सर्वांच्याच लक्षात आले. आता मात्र कुणाल ला आकाश ठेंगणे झाले होते.
समाजाची सेवा करायची पण त्यातून केवळ गोष्ट फुकट वाटून चालणार नाही ही जाणीव देखील कुणाला होती. आणि म्हणून कुणाल ने तशा मशीनचे उत्पादन करून गावोगावी आणि शहरांमध्ये देखील हात मजुरांना हे मशीन्स अतिशय माफक दरात विक्रीसाठी उपलब्ध करून दिले. त्याच्या कंपनीशी संबंधित गावांमधील महिलांना हे मशीन ना नफा ना तोटा या तत्त्वावर देण्यात आले. इतर कंपन्यांच्या कामगारांसाठी मात्र अतिशय विक्री किंमत लावून ते देण्यात आले. या मशीनमुळे महिलांची उत्पादकता तर वाढलीच पण त्यासोबत त्यांचा कामामुळे शरीरावर येणारा ताण कमी झाला आणि पर्यायाने सर्वच जण आनंदी राहू लागले. हळूहळू या मशीन मध्ये अधिक सुधारणा करत काही मशीन सौरऊर्जेवर काही विद्युत ऊर्जेवर तर काही डिझेलवर चालणारे मशीन्स देखील त्याने तयार केले. आणि हे सर्व मशीन रेशीम सूत्र या ब्रँड खाली त्याने विकण्यास सुरुवात केली.
रेशीम सूत्र यांचीही मशीन केवळ महिलांचे सबलीकरण करत नसून त्यांना नव्या रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध करून देत आहे. यासोबतच अनेक डिझेलवर व विजेवर चालणारे मशीन यांना ते पर्याय म्हणून पुढे आले आहे आणि त्यामुळे प्रति वर्षाला सहा हजार टन हुन अधिकचे घातक गॅसेस हवेत सोडण्यास पासून रोखण्यात त्याला यश आले आहे. केवळ मशीन चालवणाऱ्यांना तो रोजगार मिळाला आहे असा नसून मशीन विक्री करण्यासाठी देखील ग्रामीण भागातील लोकांचा एक मोठा नेटवर्क उभा करण्यात आला आहे आणि त्यातून देखील अनेक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. श्रम कमी होण्यासोबतच दहा हजाराहून अधिक महिलांचे उत्पन्न हे अनेक पटीने वाढला आहे कारण या मशीनमुळे कामाची गती प्राप्त झाली आहे.
केवळ मशीन विक्री पुरतात मर्यादित न राहता रुरल एक्सपीरियंस सेंटर देखील त्यांनी उभे केले आहेत. या केंद्रांमधून अनेक महिलांना रोजगाराच्या नव्या संधी बद्दल अवगत केले जाते व्यवसायिक शिक्षण दिले जाते आणि अशा ट्रेनिंग मधून त्यांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी प्रेरित देखील करण्यात येते. अशा महिलांसाठी अनेक मशीनवर ते झारखंड सरकार सोबत मिळून सबसिडी देखील जाहीर करण्यात आली आहे. शेकडो खेड्यांमध्ये हजारो महिलांना आपल्या पायावर उत्तम रित्या उभं करत असतानाच कुणाल ने स्वतःचा व्यवसाय वाढीचे देखील अनेक मार्ग शोधले आहेत. केवळ ट्रेनिंग पुरता मर्यादित न राहता या महिलांसाठी कच्चामाल इकडे त्यांच्याकडून तयार झालेला मालक पुन्हा विकत घेणे बाजारपेठेची पूर्ण कल्पना देणे व बाजार भावा इतकेच मोबदला त्यांना मिळवून देणे या सर्व गोष्टी रुरल एक्सपीरियंस सेंटर मधून करण्यात येत आहेत.
एकीकडे समाजासाठी ना नफा ना तोटा तत्त्वावर या मशीनचे निर्मिती करून विकत असताना यातून स्वतः कुणाल साठी अनेक नव्या व्यवसायाच्या संधी देखील उपलब्ध झाल्या आहेत. आणि त्यातून अनेक खाजगी कंपन्यांकडून नवनवीन मशिनरीची मागणी कुणाल कडे होत आहे. व प्रत्येक वेळी अशी मशिनरी पुरवल्या नंतर त्यामागे भरघोस नफा देखील ही कंपनी आज कमवत आहे. आपण पुरवत असलेल्या या मशिनरीचा सेवेचे परिक्षेत्र वाढवत असताना कुणाल आता केवळ झारखण्ड पुरता मर्यादित न राहता छत्तीसगड ओरिसा बिहार अशा अनेक राज्यांमध्ये देखील कुणालची ही मशिनरी पोहोचली असून अनेक विदेशी कंपन्यांकडून देखील अशा मशीनची विचारणा अलीकडे होत आहे. सामाजिक जाणिवेतून सुरू केलेल्या या सामाजिक स्टार्ट चे रूपांतर हळूहळू व्यवसायिक दृष्ट्या देखील प्रगत स्टार्टअप कडे होत आहे हे विशेष.