नागरिक किंवा ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन जर आपण एखादी सेवा सुरू केली किंवा उत्पादन तयार केले तर ते नक्कीच यशस्वी होते. माय गेट हे त्याचे लख्ख उदाहरण आहे.कसं सुरू झालं हे स्टार्टअप, आजवरचा त्याचा प्रवास कसा आहे, त्याचा हा आढावा…
इंडियन एअर फोर्स मधील दहा वर्षांच्या सर्विस नंतर 2010 मध्ये विजय अरीशेट्टी हा बेंगलोर मध्ये स्थायिक झाला. बंगलोर मधील एका सुखवस्तू गेट कम्युनिटीमध्ये राहू लागला. या सोसायटीमध्ये राहायला आल्यानंतर विजयला तेथील सिक्युरिटी गार्ड या काम करण्याच्या प्रणालीचा येणाऱ्या-जाणाऱ्या पाहुण्यांच्या चौकशी करण्याच्या पद्धतीचा व त्यांना आत प्रवेश द्यायचा की नाही यासाठी रहिवाशांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा या सर्वच प्रणालीचा एकूणच दांभिकपणा लक्षात येऊ लागला. त्याच्या लक्षात आलं की ही सगळी सिक्युरिटी मंडळी आणि एकूणच ही सगळी सुरक्षा प्रणाली केवळ दाखवण्यापुरते काम करत आहे आणि गांभीर्याने याला सिक्युरिटी तर सोडाच पण रहिवासी देखील याकडे फारसे लक्ष देत नाहीत. सिक्युरिटी नेजरी प्रामाणिकपणे एखाद्याला फोन केला ते तुमच्याकडे गेस्ट आले आहेत की नाही तर अनेकदा इंटरकॉम चे फोन उचलला जात नसत. येणाऱ्या पाहुण्यांना किंवा डिलिव्हरी बॉय ला केवळ ते सांगतात म्हणून फक्त आज सोडले जात असत. त्यासाठी योग्य ती पडताळणी केले जात नसत.
हे सगळे पाहता विजयला आपले पूर्वीचे इंडियन एयरफोर्स मधील कॅन्टोन्मेंट मधले दिवस आठवू लागले. आणि तिची शिस्त व त्यासोबतच वाटत असलेली सुरक्षितता इथे मात्र गेटपाशी टांगली जात आहे असं त्याला भासू लागलं. इंडियन एअर फोर्स मधील कॅन्टोन्मेंट असुरक्षितता वाटते तशी सामान्य लोकांना का उपलब्ध करून देता येऊ नये असा प्रश्न त्यांच्या मनात उभा राहिला. आणि याच प्रश्नावर उत्तर शोधण्याचा प्रवास सुरू झाला.
बेंगलोर शहरातील इतर कम्युनिटीमध्ये राहणाऱ्या लोकांना त्याने संपर्क करण्यास सुरुवात केली. आणि इतर सोसायटी मधील रहिवाशांशी त्यांनी संपर्क साधला. आणि त्यांच्या सोसायटीमधील प्रश्नांना देखील समजून घेण्यास सुरुवात केली. तेव्हा विजयची असं लक्षात आलं की प्रत्येक सोसायटीचे आपापले काही विशिष्ट प्रश्न आहेतच. आणि कमी अधिक प्रमाणात मध्ये प्रत्येकासमोर कुठल्या ना कुठल्या अडचणी असून कुणीही आपल्या सुरक्षा प्रणालीबाबत शंभर टक्के समाधानी नाही.
आणि इथेच दिसू लागली ती म्हणजे एक मोठी व्यवसायाची संधी. विजय नाही आता ह्या प्रश्नाकडे एक संधी म्हणून पाहण्यास सुरुवात केली. आता बंगलोर शहरात सोबतच इतर शहरांमधील अभ्यास करण्यास देखील त्याने सुरुवात केली. आता रिसर्च करण्यासाठी आणि बिझनेस मॉडेल डेव्हलप करण्यासाठी त्याला आपल्या दोन मित्रांची आठवण झाली. बिझनेस मॉडेल तयार करण्यात हातखंडा असलेला श्रेयांस डागा हा विजयचा इंडियन स्कूल ऑफ बिझनेस मधील वर्गमित्र. त्याच्याशी संपर्क साधून आपली संकल्पना विजयने त्याला समजावली. आणि या संकल्पनेचे एका मोठ्या व्यवसायाची संधी ही श्रेयांस ला देखील दिसू लागली. तेव्हा श्रेयांशी देखील विजयची साथ या व्यवसायात देण्याची हमी दिली.
कुठलाही व्यवसाय हा संपूर्ण मार्केट रिसर्च केल्याशिवाय सुरू करू नये असं तज्ञांचं नेहमीच मत असतं. आणि म्हणून यांनी मार्केटचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. मार्केट असच म्हटलं की विजयला चटकन आपला गोल्डमन सॅक्स या कंपनीतील सहकर्मचारी अभिषेक कुमार याची आठवण झाली. आणि त्याने अभिषेक शी संपर्क साधला. अभिषेक नाही हे प्रपोजल ऐकताक्षणी स्वीकारले.
सलग तीन वर्षे केलेल्या अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर माय गेट या ऑनलाईन सिक्युरिटी सिस्टीम ची मुहूर्तमेढ 2015 साली रोवण्यात आली. रहिवासी सोसायट्यांना अधिक सुरक्षित करणे रहिवाशांना सुरक्षा आणि इतर सुविधान बाबत सुटसुटीत पणा देणे व एकूणच सर्व सोसायटीचे नियमन करून सर्व सुविधा योग्य पद्धतीने मॅनेज करणे. या सर्व गोष्टी पुरविण्यासाठी माय गेट या कंपनीची स्थापना करण्यात आली.
माय गेट हे एक ॲप आहे जी प्रत्येक व्यक्ती आपल्या मोबाईल फोनवर इन्स्टॉल करून ठेवू शकतो. या ॲप वरून सर्व रहिवासी आपल्या सुरक्षा प्रणाली ची संपूर्ण माहिती घेऊ शकता, सिक्युरिटी मॅनेजमेंट किंवा सिक्युरिटी गार्ड सोबत संपर्क साधू शकता, मुले सोसायटीमध्ये खेळत असताना त्यांच्यावर लक्ष देखील ठेवू शकता, येणाऱ्या प्रत्येक विजिटर ची नोंद पाहू शकता, सोसायटीतील सर्व अमेनिटी बुक करू शकता, सोसायटीची व्यवस्थापन कमिटी यांच्याशी देखील संपर्क साधू शकता, सोसायटीचा मेन्टेनन्स भरू शकता, कॅब बुक करणे किंवा डिलिव्हरी बॉय येणार असल्याची सूचना देणे व आपण ऑर्डर केलेले पार्सल गेटवर आलेले आहे की नाही याची देखील माहिती मिळवणे, या व अशा अनेक सुविधा केवळ ह्या ॲप मधून रहिवासी घेऊ शकतात.
2015-16 हा काळ ई-कॉमर्स कंपन्यांचा भारतात मोठ्या प्रमाणात संख्या वाढवण्याचा काळ होता. आणि याच काळात खरी गरज होती ती गेटवरील सिक्युरिटी आणि येणाऱ्या जाणाऱ्या डिलिव्हरी बॉईज यांचे नियमन करण्याची. आणि अगदी हाच प्रश्न माय गेट ने प्रथम हाती घेतला होता व त्यात यश प्राप्त झाले. सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागताच माय घेतली हळूहळू इतर प्रश्नांना हात घालण्यास सुरुवात केली. त्यात सोसायटीतील ॲमिनिटी बद्दलचे प्रश्न असतील, अंतर्गत सविधान बद्दलचे प्रश्न असतील किंवा इतर काही. रहिवाशांचे प्रश्न सोडवितानाच त्यांनी सोसायटीच्या व्यवस्थापनाचे प्रश्न देखील विचारात घेण्यास सुरुवात केली. मॅनेजमेंट, सोसायटीचे अकाउंटिंग, कर्मचाऱ्यांचे पॅरोल व इतर तत्सम सोसायटी व्यवस्थापनातील प्रश्नांना देखील माय गेट ने हात घातला. आणि बघता बघता आज माय गेट एक संपूर्ण सोसायटी व्यवस्थापनाचे सॉफ्टवेअर म्हणून नावारूपाला आले आहे. सोसायटीतील कुठलाही प्रश्न आज तुम्ही माय गेट वापरून सोडवू शकता.
केवळ पाचच वर्षात माय गेट यांना 12000 सोसायट्यांची ऑर्डर मिळाली असून 2020 अखेरीस ते 20 लाख रहिवाशांच्या घरात पोहोचले आहेत. शंभरहून अधिक शहरांमध्ये पोहोचलेला हा विस्तार या ॲपचे यश नक्कीच सिद्ध करतो. प्रत्येक तासाला माय गेट वरून दीड हजारहून अधिक लोकांची पडताळणी आज होत आहे.
भारतीय गुंतवणूकदारांना सोबतच परदेशी गुंतवणूकदारांचा पसंतीला खरे ठरलेल्या माय गेटला आजपर्यंत 160 कोटी रुपयांची गुंतवणूक देखील प्राप्त झाली आहे. इंटरनेट टेक्नॉलॉजी वर आधारित असलेल्या या माय गेट ऍप चे भविष्य अतिशय उज्ज्वल दिसत आहे
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!