आयआयटीतून शिक्षण घेतलेल्या दोन तरुणांनी खऱ्या अर्थाने भन्नाट म्हटले जाईल असे स्टार्टअप सुरू केले आहे. त्यामुळेच त्याचा आजा सर्वत्र बोलबाला आहे. जाणून घेऊ या अनोख्या स्टार्टअपबद्दल…
मयंक कच्छवाह आणि गौरव चोपडा आयआयटी मद्रास मधून २००५ मध्ये आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून कॅपिटल वन नावाच्या ब्रिटिश कंपनीमध्ये नोकरीला लागले. इंग्लंड मध्ये सर्व प्रकारचे कर्ज पुरविणारी कॅपिटल वन ही एक नावाजलेली कंपनी होय. या कंपनीमार्फत सर्वच प्रकारचे लोन अगदी सुलभरित्या दिले जातात. लोन घेणार्याचे कागदपत्र, त्याची विश्वासार्हता आणि त्याने लोन परत करण्याची क्षमता या सगळ्या गोष्टी ऑनलाईन पद्धतीनेच या कंपनीद्वारे चेक केल्या जातात. या कंपनीत लागल्यापासूनच दोघांच्याही मनात लोन वितरण करण्याच्या पद्धती बद्दल विशेष कुतूहल वाटू लागले.
भारतात कोणाला जर कर्ज घ्यायचं असेल तर मात्र अशी कुठलीही ऑनलाइन प्रकारची पद्धत नसून प्रत्येक वेळेला तुम्हाला फिजिकल कागदपत्र उपस्थित करावे लागतात. आणि या कागदपत्रांच्या जोरावरच कर्ज घेणाऱ्याची मूल्यमापन कंपन्यांद्वारे केले जाते. आणि यामुळे कर्ज मिळविण्याच्या प्रक्रियेत फार दिरंगाई होत असते. आणि कागदोपत्री जर कोणाला आपली विश्वासार्हता सिद्ध करता आली नाही तर मात्र कितीही गरज असून देखील त्या व्यक्तीला लोन दिले जात नाही. भारतात असलेल्या कर्ज बाजाराची ही परिस्थिती या दोघांनाही चांगलेच ज्ञात होती. आणि म्हणूनच अनेकदा दोघांच्याही चर्चेमध्ये भारतात अशी एखादी कंपनी असावी असं सतत येत असे.
2015 मध्ये गौरव चोपडाने अखेर तो निर्णय घेतला. आपला आठ-दहा वर्षांचा कर्ज क्षेत्रातील अनुभव व याकाळात जमवलेली मिळकत घेऊन गौरव भारतात परतला. आणि कर्ज क्षेत्रात कॅपिटल वन सारखी कंपनी स्थापन करण्याच्या शक्यता पडताळू लागला. याकरता त्याने अनेक बँका यांच्याशी संपर्क साधला. या सोबतच अनेक कर्ज घेणारे ग्राहक व कर्ज न मिळालेले लोक यांच्या देखील त्याने भेटी घेऊन सर्वान समोरील अडचणींचा पूर्ण अभ्यास केला. तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की कर्जाची गरज अनेकांना असली तरी स्वतःची केवळ विश्वासार्हता सिद्ध करता येत नसल्यामुळे लोकांना कर्ज मिळणं अवघड होत आहे.
हा सर्व अभ्यास करताना त्याच्या आणखी एक मोठी गोष्ट लक्षात आली ती म्हणजे बँका किंवा कुठलीही वित्तीय संस्था कर्ज देताना कमी रकमेचे कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. याउलट मोठ्या रकमेचे कर्ज देण्यासाठी उत्सुक असतात. आणि त्यामुळे विश्वासार्हता असून देखील लहान कर्जांची गरज असलेल्या लोकांना कर्ज सहज उपलब्ध होत नाही. आणि म्हणून बऱ्याच जणांना वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोनचा मार्ग अवलंबावा लागतो. पर्सनल लोन वर मात्र अवाजवी दराने व्याज घेतले जाते आणि त्यामुळे हे कर्ज न परवडणारे होते.
यासोबतच ग्राहकाच्या परिसरात नजीकच्या अंतरावर असलेल्या बँकांकडून किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. दूर अंतरावर असलेल्या बँका किंवा वित्तीय संस्था यांच्यापर्यंत ग्राहक पोहोचू न शकल्यामुळे स्वस्त दरात किंवा इतर सुविधा असलेले कर्ज ग्राहकांना सहज रित्या उपलब्ध होत नाही.
या आणि अशा अनेक प्रश्नांवर उत्तरे शोधून काढण्यासाठी 2015 मध्ये गौरव चोपडा याने इंडिया लॅन्डस ह्या कंपनीची स्थापना केली. अनेक वर्षात सोबत काम केलेल्या आणि याच विचारांवर अनेकदा सोबत चर्चा करत असलेला मयंक याला देखील गौरवने आपल्या या कंपनीत सामावून घेण्याचा निर्णय घेतला. व मयंक ने देखील दिरंगाई न करता पटकन आपली नोकरी सोडून या व्यवसायात गौरव सोबत उतरण्याचे ठरवले.
व्यवसाय हा पूर्णपणे ऑनलाईन डिजिटल पद्धतीने करण्याचा निर्णय झाला. म्हणजे कर्ज मिळवण्यासाठी करायच्या असलेला अर्ज त्यासाठी लागत असणारे सर्व कागदपत्र व बँकांची किंवा व्यक्ती या संस्थांशी करावयास लागणारी चर्चा आणि लोनचे अप्रोवल या सर्व गोष्टी एका मोबाईल ॲप मधून घडवून आणायच्या. यासाठी सगळ्यात मोठा सपोर्ट आणि व्यवस्था लागणार ती म्हणजे बँकांची. भारतभरातील 50 हून अधिक बँका व कर्ज देणार्या वित्तीय संस्था यांच्याशी कंपनीने टायअप केले. या सर्व बँकांनी ऑनलाईन कर्ज देण्याच्या या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी होकार दिला.
आता प्रश्न होता तो म्हणजे कर्ज घेणाऱ्या पर्यंत पोहोचण्याचा. याकरता मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करणं गरजेचं होतं. मार्केटिंग करताना सामान्य पद्धतीने मार्केटिंग करण्यापेक्षा विशिष्ट कर्जाची गरज असलेल्या लोकांना टारगेट करून मार्केटिंग करणं जास्त महत्त्वाचं होतं. आणि म्हणूनच सर्व बँका व वित्तीय संस्था यांच्याकडून कर्जासाठी अर्ज केलेले परंतु रिजेक्ट करण्यात आलेले अशा लोकांचा डेटा गोळा करण्यास सुरुवात केली. हा सर्व डेटा अभ्यास करण्यास या दोघांनी सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की लॉन देण्यासाठी ही लोक अपात्र नक्कीच नाहीत परंतु केवळ लोन मिळवण्यासाठी लागणारी मोठी प्रक्रिया सर्व कागदपत्रांच्या तरतुदी व लोणची किरकोळ रक्कम या सर्व कारणांमुळे या लोकांना एकतर लोन मिळत नव्हतं किंवा अति किचकट प्रक्रिया असल्यामुळे यांनीदेखील फॉलोअप घेणं सोडून दिलं होतं.
अशा सर्व लोकांच्या गरजा पूर्ण होतील व त्यासाठी कमीत कमी कागदपत्र आणि प्रक्रिया लहान करून या सर्व लोकांना लोन मिळवून देण्याचा प्रयत्न कंपनीकडून करण्यात आला. आता कंपनीने स्वतः प्रत्येक ग्राहकाचे क्रेडिट अप्रेजल म्हणजे विश्वासार्हता पडताळणी करण्यास सुरुवात केली. आणि केवळ त्यांच्या फायनान्शिअल स्टेटमेंट पाहून त्यांना कर्ज नाकारणं या ऐवजी त्यांची खऱ्या अर्थाने कर्ज परतफेड करण्याची क्षमता अभ्यासण्यास यांनी सुरुवात केली. आणि ही तपासण्यासाठी केवळ बँकेचे स्टेटमेंट न पाहता या लोकांचे विज बिल मोबाईल रिचार्ज केबल टीव्ही रिचार्ज या सर्व गोष्टींचा देखील बारकाईने अभ्यास केला. आणि जर या दैनंदिन गरजांचे पेमेंट हे लोक जर वेळेत करत असतील तर कर्जाची परतफेड करणं यांना खचितच अवघड नाही अशा पद्धतीने निष्कर्ष काढून त्यांनी लहान सहान लोन देण्याचा देखील सुरुवात केली.
कागदपत्र कमीतकमी, त्यात कमी व्याजदर आणि अवघ्या दोन ते तीन तासांमध्ये कर्ज संक्शन करून आणणे यामुळे इंडिया लँड्स या कंपनीची लोकप्रियता अतिशय झपाट्याने वाढली. पहिल्या पाच वर्षांमध्ये तब्बल 500 कोटी रुपयांचे कर्ज या कंपनीने वाटले आहे. आज पर्यंत एक कोटी 40 लाख हून अधिक संतुष्ट ग्राहकांना गरजेप्रमाणे कर्ज उपलब्ध करून देण्यात या कंपनीचा मोठा वाटा आहे. अनेक बड्या बँकांकडे देखील कर्ज देण्यासाठी वित्त उपलब्ध असून देखील केवळ लहान कर्जांसाठी एजंट किंवा कर्मचारी फार प्रयत्न करत नसल्यामुळे हे कर्ज वाटप होत नव्हते. मात्र या कंपनीमुळे बँकांचा आणि वित्तीय संस्थांचा हा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात सुटला आहे.
राष्ट्रीयकृत व खासगी बँकांकडून छोट्या रकमेचे कर्ज देखील सामान्य नियम आणि मध्येच मिळत असल्याकारणाने बड्या व्याजदर यांचे पर्सनल लोन आता ग्राहकांना घ्यावे लागत नसल्यामुळे त्यांचे देखील द्वितीय प्रश्न हे आता स्वस्तात सुटत आहेत. म्हणजे एकीकडे पैसा वाटप करण्यास तयार असलेल्या वित्तीय संस्था व दुसरीकडे पैशांची गरज असलेले व कर्ज घेऊ इच्छित असलेले अनेक लोक या दोघांमध्ये एक महत्त्वाचा दुवा म्हणून इंडिया लेंडस आज कार्यरत आहे.
हे सर्व घडवून आणण्यासाठी कंपनी द्वारे अतिशय माफक फी बँका व वित्तीय संस्थांकडून आकारण्यात येते. आणि या फीच्या जोरावरच कंपनी अतिशय कमी कालावधीमध्ये नफ्यात आली आहे व 10 ते 15 टक्के प्रतिमहा या दराने कंपनी विकास सुरू आहे. वेगवेगळ्या फंडिंग राऊंड मधून विविध गुंतवणूकदारांकडून कंपनीला आज वर 120 कोटी रुपयांहून अधिक ची गुंतवणूक प्राप्त झाली असून याविरुद्ध ओळखीचा मोठा भाग हा कंपनी चे तंत्रज्ञान अपग्रेड करण्यासाठी व स्वतःचे ॲप व वेबसाईट अधिक उत्तम पद्धतीने डेव्हलप करण्यासाठी वापरण्यात येत आहे. कंपनीची वाढती गर्दी पाहता पुढील दहा वर्षांमध्ये ही कंपनी एक हजार कोटी रुपयांपर्यंतचा मूल्यांकनात पात्र ठरू शकते असा विश्वास अनेक गुंतवणूकदारांकडून व्यक्त होत आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!