मूकबधिरांच्या कलागुणांना वाव देत असतानाच कोट्यवधींची कंपनी उभी करणारी स्मृती नागपाल हिच्या ‘अतुल्यकला’ या भन्नाट स्टार्टअप बद्दल…
दिल्लीतील एका कौटुंबिक व्यवसायात जन्माला आलेल्या स्मृती नागपालला एखादी भाषा बोलता येण्यापूर्वीच मूकबधिर यांची चिन्हांची व खाणाखुणांची भाषा आधी यायला लागली. कारण तिच्याच घरात तिचे सख्खे मोठे बहीण व भाऊ हे जन्मताच मूकबधिर होते. त्यामुळे अशा व्यक्तीला समोर येणार्या संकटांना व अडचणींना तिने जवळून पाहिले होते. आणि त्यामुळेच अगदी लहान वयापासून या प्रश्नांना कुठल्या पद्धतीने सोडवता येईल यावर तिच्या मनात सतत विचार सुरू असे.
अशा लोकांसाठी असलेल्या विशिष्ट शाळांमध्ये आणि ट्रेनिंग स्कूलमध्ये जाऊन तिने अभ्यास केला होता. तेव्हा तिच्या लक्षात आलं की ह्या लोकांना कितीही विशिष्ट प्रकारचा शिक्षण किंवा कौशल्य अवगत करुन दिलीत तरी समाजातून केवळ दयेच्या भावनेने त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि कामाचे स्वरूप मात्र शारीरिक कष्टाचे असते.
२०१३ सालची गोष्ट, असंच एकदा आपल्या मोठ्या बहिणी सोबत एका कला प्रदर्शनात गेली असता स्मृति हिची भेट अमित वर्धन यांच्याशी झाली. स्मृतीला देखील खाणाखुणांची भाषा येत असल्यामुळे अमित वर्धन हे मूकबधिर असून देखील त्यांच्याशी स्मृतीने त्यांच्या कलाकृतीबद्दल भरपूर चर्चा केली. तेव्हा तिचे असं लक्षात आलं की अमित वर्धन हे फाईन आर्ट्स मधील पदव्युत्तर शिक्षण घेऊन कला क्षेत्रात आपले करिअर घडवण्यासाठी झटत होते. पण अनेक संस्थांकडून त्यांना केवळ एक कलाकुसर करणारे कामगार इतकीच संधी मिळत गेली. आणि शिक्षणानंतर तब्बल नऊ वर्ष झगडून देखील केवळ एक कामगार म्हणूनच त्यांना नोकरी स्वीकारावी लागली होती.
मूकबधिरांसाठी काही तरी करण्याची तळमळ स्मृतीच्या मनात आधी पासुनच होती पण अमित वर्धन यांची भेट झाल्यामुळे आता त्यात तळमळीला मार्ग दिसू लागला होता. दरम्यान तिला दूरदर्शन वरील एका वाहिनीवर नोकरी देखील लागली असल्याने त्यातून ती हळूहळू आपल्या व्यवसायासाठी पैसे जमवत होती. या मूकबधिर यांना कामगार या श्रेणीतून कलाकार या श्रेणीमध्ये कसा आणता येईल यावर तिचा सतत विचार सुरू आहे आणि त्याच कारणासाठी ती अनेकदा अमित वर्धन यांची भेट देखील घेत असे. हे करत असताना तिने ज्या वेळेला अमित वर्धन यांनी बनवलेल्या वस्तू पाहिल्या तर तिचा स्वतःवरच विश्वास बसत नव्हता. एखाद्या मोठ्या ब्रांडेड शोरूम मध्ये महागड्या विकल्या जाणाऱ्या कलाकुसरीच्या वस्तू नपेक्षा देखील सरस वस्तू समित्यांनी हाताने तयार केल्या होत्या.
आणि ह्यातून तिला सुचली एका भन्नाट व्यवसायाची कल्पना. आणि वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी म्हणजेच २०१६ साली अतुल्य कला या नावाने तिने आपल्या कलादालनाची सुरुवात केली. यात तुम्हाला हवी असलेली वस्तू हव्या तशा पद्धतीने डिझाईन करून मिळेल त्यासोबत सर्व मूकबधिर कामगार यांना सोबत घेऊन त्याचे उत्पादन देखील करून मिळेल अशी त्याची जाहिरात देखील करण्यास सुरुवात केली.
आपल्या नोकरी मधून जमवलेलं दीड लाख रुपयांचे भांडवल तिने या व्यवसायात गुंतवले. वडील व्यवसायिक असल्याने व दिल्ली शहरात हे कलादालन स्थापन केले आणि अनेक कंपन्यांकडून त्यांना स्वतःचे लोगो असलेल्या डिझायनर वस्तूंची मागणी येऊ लागली. इतकेच नव्हे तर अमित आणि त्यांच्यासारखे अनेक मूकबधिर डिझायनर्स हे आता कंपन्यांचे लोगो व्हिजिटिंग कार्ड सिम्बॉल्स हेदेखील डिझाईन करू लागले. आणि हा व्यवसाय देखील उत्तम रीतीने सुरू झाला.
पण सर्व काही सुरळीत सुरु असताना स्मृतीच्या एक लक्षात आलं आणि तो म्हणजे संवादातील अडथळा. येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला चिन्हांची व खुणांची भाषा येतेच असं नाही. आणि त्यामुळे स्मृती तिथे असेल तरच कंपन्यांमधील ग्राहक हे कारागिरांना आपली गरज व अपेक्षा समजावू शकतात. त्यामुळे हा व्यवसाय आज जरी उत्तम वाटत असला तरी याला मोठं करणं हे कुठेतरी अडचणीचा ठरणार होता. यावर पर्याय काय असा विचार ती स्वतः करत असताना अमित वर्धन यांची देखील चर्चा करत होती.
यातून त्यांच्या असं लक्षात आलं की आपण डिझायनिंगची सेवा आणि गरजेप्रमाणे डिझायनर वस्तू बनवून देण्याऐवजी आपल्याकडे उपलब्ध असलेले कौशल्य वापरून विविध प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू आधीच तयार करून ठेवून त्या अनेक ठिकाणी विक्रीसाठी ठेवू शकतो. आता त्यांनी आपण कुठल्या वस्तू पुरवू शकतो याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. आणि अमित वर्धन व त्यांच्या सारखे असलेले अनेक कुशल कलाकार यांच्याकडून अतिशय कलात्मक अशा वस्तू तयार होऊ लागल्या.
बाजारात कुठल्या वस्तू जास्त चालू शकतात याचा अंदाज घेत असताना त्यांनी काही ठराविक वस्तू सुरुवातीला बाजारात आणण्याचा निर्णय घेतला. त्यात प्रथमता होत्या वह्या, लेडीज पर्स, कॉफी मग, टिफिन बॉक्स कवर, सोफा कवर, फ्रिज मॅग्नेट आणि तत्सम सजावटीच्या कलापूर्ण वस्तू. मोठ्या प्रमाणात ह्या वस्तू तयार करून घेऊन आता त्या दिल्लीतील मोठ्या शोरूम्स व मॉल्समध्ये विक्रीसाठी ठेवण्यास त्यांनी प्रारंभ केला.
दुसऱ्याच्या दुकानात किंवा शोरूम मध्ये विक्रीसाठी ठेवताना त्यांनी कटाक्षाने एक नियम पाळला आणि तो म्हणजे आपले प्रॉडक्ट विकताना हे दुसऱ्या कोणाच्या ब्रांड ने न विकता आपल्याच कंपनीचे नाव मोठं करायचं आहे हे लक्षात ठेवायचं आणि आपल्याच ब्रँड खाली त्या वस्तू विकल्या गेल्या पाहिजेत. त्यांच्या हट्टापायी त्यांना मोठ्या आर्थिक संधी देखील गमवाव्या लागल्या याचा त्यांना दीर्घकाळ यामध्ये फायदाच होणार आहे. कारण अनेक दुकानदार त्यांच्याकडून वस्तू तयार करून घेऊन स्वतःच्या नावाने विकण्यास उत्सुक होते व त्यासाठी चांगला मोबदला देखील द्यायला तयार होते पण त्यांनी त्या सर्व संधी नाकारल्या.
व्यवसाय वाढीकरता बदलत्या काळासोबत यांनी देखील आपल्या विक्रीची पद्धत बदलून आता फ्लिपकार्ट, ॲमेझॉन सारख्या ऑनलाइन स्टोर स्वर देखील आपल्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला यातून त्यांना फार उत्पन्न मिळत नसेल पण जसं लोकांना यांच्या ब्रँडची माहिती होऊ लागली आणि कॉलिटी व फॅशनची खात्री पटू लागली त्या वेळेला मात्र ऑनलाइन देखील या कंपनीच्या वस्तूंचा खप झपाट्याने वाढला.
सुशिक्षित व्यवसायिक असल्याकारणाने स्मृतीला आपल्या वस्तू परदेशातील मॉल्समध्ये देखील कसे विकता येतील याची पूर्ण कल्पना होती. आणि म्हणून तिन्ही भारताबाहेरील काही निवडक शहरांमध्ये देखील आपल्या वस्तू पाठवण्यास सुरुवात केली. आणि ह्यातून तीला अपेक्षेपेक्षाही जास्त नफा प्राप्त होऊ लागला.
केवळ १ लाख ५० हजार हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर सुरू केलेला हा व्यवसाय अवघ्या दोन वर्षांमध्ये दीड कोटी रुपयांची उलाढाल करू लागला. केवळ मूकबधिर आणि बनवलेल्या वस्तू आहेत म्हणून सहानुभूती पोटी लोकांनी या वस्तू विकत घेऊ नयेत तर त्या वस्तूंची गुणवत्ता व कलाकुसर याचा खराखुरा मोबदला या वस्तूंचा मिळावा अशी या कंपनीच्या सर्वच कलाकारांची व स्मृतीची देखील इच्छा असते.
कंपनीच्या नफ्याचा विचार केला तर बहुतांश वस्तूं मध्ये नफा हा किमान १०० ते १२५ टक्के असतो. त्यामुळे कंपनीची वृद्धी ही अतिशय झपाट्याने सुरू आहे. कंपनीला पहिली गुंतवणूक आपले २०% मालकी हक्क देऊन ३० लाख रुपयांची मिळाली होती. आणि त्यानंतर झालेल्या अनेक गुंतवणुकीचा राऊंड मधून कंपनीची एकूण गुंतवणूक आता कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
स्मृतीच्या मते अतुल्यकला ही एक एनजीओ नाही म्हणजे केवळ समाजसेवा करण्यासाठी म्हणून ही संस्था सुरू करण्यात आलेले नाही. तर समाजाची सेवा करत असतानाच व्यावसायिक दृष्ट्या काम करून अधिकाधिक नफा कसा कमावता येईल याकरिता ही कंपनी काम करत असते. आणि होणारा नफा हा आपल्याकडील मूकबधिर कलाकारांना मुबलक प्रमाणात वाटत असते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!