नाशिक –जिल्हयातील म्युकरमायकोसिस रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता, जिल्हा सामान्य रुग्णालय येथे मनुष्यबल व आधुनिक साधन सामुग्री उपलब्ध होईपर्यंत रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणुन खाजगी कान, नाक व घसा तज्ञ डॉक्टर्स यांना सेवा देण्याचे आवाहन केले होते.
जिल्हाधिकारी मांढरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत म्युकरमायकोसिस रुग्णांच्या शस्त्रक्रीया करण्यासाठी खालील सहा डॉक्टर्सने सहमती दर्शविली आहे. डॉ. नितीन देवरे, कान,नाक व घसा तज्ञ भ्रमणध्वनी क्रमांक ९७६२७२५९५७ हे सोमवारी, डॉ.राजेन्द्र पगारे कान, नाक व घसा तज्ञ भ्रमणध्वनी क्रमांक ९८२२०४५९१५ हे मंगळवारी, डॉ.मुकेश मोरे, कान,नाक व घसा तज्ञ भ्रमणध्वनी क्रमांक ९२२४५०७९१५ हे बुधवार व गुरुवार, डॉ.सौमीन गडकरी Oral Maxillo Facial Surgeon भ्रमणध्वनी क्रमांक ७९७२५७४६०७ हे मंगळवार व शुक्रवार, डॉ.गुंजन मनचंदा कान,नाक व घसा तज्ञ भ्रमणध्वनी क्रमांक ९७६६९२०८९६ हे शनिवार आणि डॉ. गिरीष नेहते Occuloplastic Surgeon भ्रमणध्वनी क्रमांक ७७३८०९२६०४ हे गुरुवार या दिवशी उपरोक्त सर्व डॉक्टर्स आपली सेवा नाशिक जिल्हा रुग्णालय येथे देणार आहेत.