नाशिक – नाशिक शहर व जिल्ह्यातील रुग्ण संख्या विचारात घेता आपण १२ मे पासून काही निर्बंध कठोर केले होते. त्यानंतर रुग्ण संख्या चांगल्यापैकी नियंत्रणात आलेली आहे. त्यामुळे आपण स्थानिक स्तरावर कठोर केलेले निर्बंध २३ मे रात्री बारा वाजल्यापासून शिथिल करत आहोत. परंतु याचा अर्थ लॉकडाऊन पूर्ण उठला आहे असे नाही असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहे. त्यांनी नागरिकांच्या माहितीसाठी एक व्हिडिओ क्लीप केली असून त्यात त्यांनी सर्व माहिती दिली आहे.