इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जैसलमेरच्या जिल्हाधिकारी आणि आयएएस टीना डाबी या गर्भवती आहेत. त्या लवकरच आई होणार आहे. यासाठी त्यांनी सरकारला पत्र लिहून प्रसुती रजा मागितली आहे. त्यानंतर त्यांच्या प्रेग्नेंसीची माहिती समोर आली आहे. अनेक दिवस अस्वस्थ वाटत असतानाही टीना डाबी आपली जबाबदारी चोख पार पाडत आहे. IAS टीना डाबी यांनी २० एप्रिल २०२२ रोजी IAS अधिकारी डॉ. प्रदीप गावंडे यांच्याशी लग्न केले.
टीना डाबीच्या गरोदरपणाची माहिती समोर आल्यानंतर जैसलमेरला लवकरच नवा कलेक्टर मिळेल अशी अटकळ बांधली जात आहे. टीना डाबी यांचा आतापर्यंतचा कार्यकाळ कौतुकास्पद आहे. विशेषत: त्यांनी महिलांमध्ये चांगलाच प्रवेश केला आहे.
मुलगा आवडेल की मुलगी
गेल्या काही दिवसांत पाक विस्थापित हिंदूंचे अतिक्रमण हटवण्यात आले आणि त्यानंतर टीना डाबी यांनी त्यांना त्यांच्या आश्रयासाठी जमीन दिली. यानंतर टीना या विस्थापितांना भेटण्यासाठी गेल्या असता तेथे उपस्थित असलेल्या एका वृद्ध महिलेने आनंदाने त्यांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला. त्यावर टिना डाबी यांनी हसत उत्तर दिले होते की, मुलाऐवजी मुलगी असली तरी चालेल.
प्रदीप गावंडे यांच्याशी दुसरे लग्न
२०१५ बॅच टॉपर IAS टीना डाबी यांनी IAS प्रदीप गावंडे यांच्याशी दुसरे लग्न केले होते. दोघे २० एप्रिल २०२२ रोजी विवाहबंधनात अडकले. आधी टीनाचे लग्न आयएएस अतहर आमिर खानसोबत झाले होते, पण नंतर त्यांचा घटस्फोट झाला.
बहीण रिया हिचेही लग्न
टीना डाबीची बहीण IAS रिया डाबी हिचेही लग्न झाले आहे. एप्रिल महिन्यात तिने आयपीएस मनीष कुमारसोबत लग्न केले. या दोघांनी गुपचूप कोर्ट मॅरेज केल्याची माहिती समोर आली आहे. मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) मध्ये प्रशिक्षणादरम्यान रिया आणि मनीष यांची भेट झाली. त्यानंतर प्रशिक्षणादरम्यान दोघांची मैत्री झाली आणि नंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले.
मनीष हे महाराष्ट्र केडरचे अधिकारी
मनीष कुमार हे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची पहिली पोस्टिंग उस्मानाबाद (महाराष्ट्र) येथे झाली. त्याचवेळी राजस्थान केडरच्या रिया डाबी या सध्या अलवरमध्ये सहायक जिल्हाधिकारी म्हणून तैनात आहेत. काही काळापूर्वी आयपीएस मनीष कुमार यांनी आपला केडर बदलण्यासाठी अर्ज केला होता. गृह मंत्रालयाने त्यांचा अर्ज मंजूर केला आहे. मनीष यांना आता महाराष्ट्राऐवजी राजस्थान केडर देण्यात आले आहे.