माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ
संपूर्ण राज्याला थंडीच्या लाटेने कवेत घेतले आहे. धुळे आणि जळगावमध्ये पारा थेट ५ अंशांवर स्थिरावला आहे. तर, ओझरमध्ये थेट ४.३ अंश सेल्सिअस तपामानाची निच्चांकी नोंद झाली आहे. नाशिकमध्ये ७.६ तर पुण्यात ७.४ अंश तपमान नोंदले गेले आहे. या आठवड्यात आर्द्रतेचा प्रभाव कमी होऊन ढगाळसदृश वातावरण निवळणार आहे. सहाजिकच हा आठवडा गारठ्याचा राहणार आहे.
येत्या पाच दिवसात म्हणजेच, आज, मंगळवार दि.१० जानेवारीपासून किमान तापमानात सरासरीपेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअसने हळूहळू घसरण होईल असे दिसते. त्यामुळे रविवार दि. १५ जानेवारी म्हणजेच संक्रांतीपर्यन्त मुंबईसह कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी थंडीची शक्यता जाणवते. दरम्यानच्या काळात मुंबईसह कोकण विभागातही किमान तापमान सरासरीइतके राहून त्या प्रमाणातच थंडी जाणवेल.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1612383296599789578?s=20&t=KoHVOyFnP8j7snQnu2HJmg
सदर थंडीमुळे आतापर्यंत असलेल्या दमट वातावरणामुळे कांदा, गहू, हरबरा सारख्या रब्बी पिकांवर परिणाम होईल. खासकरुन काही ठिकाणी झालेल्या कीड व बुरशीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. मध्य प्रदेश पर्यन्त संपूर्ण उत्तर भारतात उच्च टक्केवारीतील आर्द्रता व मंद वाऱ्यामुळे दाट धुक्याचा प्रभाव कायम आहे. त्यामुळे सकाळ प्रहरात काही ठिकाणी दृश्यमानता निम्न पातळी (समोर ५० मीटरअंतरावरील न दिसणे) पर्यंत जाणवत आहे. त्यामुळे याचा परिणाम उत्तर भारतातील दळणवळणावर निश्चितच होणार आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1612660833045336064?s=20&t=KoHVOyFnP8j7snQnu2HJmg
Cold Winter Forecast Climate Weather Alert