मुंबई – राज्यात थंडीची लाट आली असून त्यामुळे किमान तपमानात लक्षणीय घट झाली आहे. थंडीचा हा जोर येते काही दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
हिमालय पर्वतरांगांकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम देशातील अनेक राज्यांवर झाला आहे. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. त्यामुळेच आज सर्वात कमी तपमानाची नोंद नागपूर आणि धुळे येथे झाली आहे. नागपूरमध्ये ७.४ अंश सेल्सिअस तर धुळ्यात ७ अंश सेल्सिअस तपमान नोंदले गेले आहे. मुंबईतील तपमानानाही १९.२ अंश सेल्सिअस गाठले आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या भागात थंडीचा कडाका येते काही दिवस राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
राज्यातील काही शहरांमधील तपमान असे
निफाड (नाशिक) ८.५, जालना १०.८, नाशिक ११.४, उस्मानाबाद ११.३, बारामती ११.२, पुणे ११.२, जेऊर ११