पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय सैन्यात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. भारतीय तटरक्षक दलाने सहाय्यक कमांडंट पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. सर्व इच्छुक उमेदवार कोस्ट गार्ड एसी भरती साठी आजपासून म्हणजेच 19 फेब्रुवारी पासून अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी आहे. भारतीय तटरक्षक भरतीत असिस्टंट कमांडंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 1 जुलै 1998 नंतर आणि 30 जून 2002 पूर्वी झालेला असावा. तसेच या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 65 रिक्त पदांची भरती केली जाईल. या अंतर्गत, जनरल ड्युटी, जनरल ड्यूटी (पायलट/नेव्हीगेटर), जनरल ड्यूटी (महिला/SSA), तांत्रिक (इंजिनियरिंग आणि इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स), कमर्शियल पायलट लायसन्स (CPL-SSA) या पदांसाठी भरती केली जाईल.
पदभरतीची माहिती अशी
अर्ज सादर करण्यास सुरुवात: 19 फेब्रुवारी 2022
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2022
जनरल ड्युटी (GD), CPL (SSA) – 50 पदांसाठी भरती
टेक (इंजिनीअरिंग/इलेक्ट्रिकल) – 15 पदांसाठी भरती होईल.
जनरल ड्युटी GD/पायलट/नेव्हिगेटर/महिला SSA या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे सर्व सेमिस्टर/वर्षांमध्ये किमान 60 टक्के गुणांसह बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. कमर्शिअल पायलट पदासाठी उमेदवाराला भौतिकशास्त्र आणि गणित विषयांसह बारावी किंवा समकक्ष आणि प्रत्येक विषयात किमान 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक तपशीलांसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना पहावी. इच्छुक उमेदवार 19 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर, उमेदवार भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट घेऊ शकतात. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून 250 रुपये आकारले जातील. तर SC/ST उमेदवारांना यामध्ये सूट देण्यात आली आहे.