दिंडोरी – नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात सीएनजी पुरवठा सुरळीत होत नसल्याने वाहनधारक त्रस्त आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडतर्फे सीएनजी पंपाना पूरेसा सीएनजी पूरवठा होत नसल्याच्या पंपधारक सांगतात. त्यामुळे सीएनजी पंपावर किमान १२ तास सीएनजी मिळावे या मागणीसाठी सीएनजी वाहनधारकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
इंधनाचे वाढणारे दर यामुळे सामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले जात असल्याने इंधनाचा वाढीव खर्च वाचविण्यासाठी बहूतांश वाहनधारक सीएनजी वाहानांची खरेदी करत आहे. तर अनेकांनी चारचाकी वाहनांत ‘सीएनजी’ किट बसविण्यास प्राधान्य दिले आहे. मात्र सीएनजीच्या किमंतीही वाढत असून सीएनजी मिळविण्यासाठी तीन ते चार तास वाहाने पहाटे पासूनच रांगेत उभे करावी लागत असल्याने सीएनजी वाहनधारकांची आवस्था आगीतून उठून फुफाट्यात पडल्यागत झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीच्यावतीने इगतपुरी, पळसे, ओझर, चांदोरी, दोडी, पिंपळगाव, वडाळी भोई, ढकांबे तर नाशिक शहरातील जेलरोड, बिटको, पाथर्डी फाटा, त्रंबकनाका, आडगाव येथे सीएनजी पंप सुरू झाले आहे. मात्र या सर्व ठिकाणी अपुरा सीएनजी पुरवठा महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून होत असून रात्री पासूनच वाहनांची रांग लागल्या जातात. आणि महाराष्ट्र गॅस कंपनीकडून वाहनांद्वारे पुरवठा होणारा गॅस सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत संपून जात आहे. पुणे, मुंबई गुजरातमधून दररोज शेकडो वाहने येत असून जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात सीएनजी गाड्या वाढत असतांना सीएनजीच्या अपूऱ्या पुरवठ्यामूळे सीएनजी वाहनधारक त्रस्त झाले आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीच्यावतीने २६ जानेवारी २०२२ पर्यंत नाशिक शहरातील सीएनजी पंप ऑनलाईन करुन २४ तास सीएनजी पुरवठा सुरु होईल असे वाटत असतांना कंपनीकडून कासवगतीने सुरु असलेल्या कामगाजामूळे सुरु असलेल्या वाहनधारकांच्या त्रासात वाहानांच्या अधिकच्या गर्दीने व अपूऱ्या पुरवठ्याप्रमाणे भर पडत आहे. तसेच कंपनीच्या वतीने नाशिकसह जिल्हयात तीस पेट्रॉल पंपापर सीएनजी पंपांचे कामे सुरु असून काही ठिकाणी काम पूर्ण होवूनही पंप सुरु झालेले नाहीत, तर काही ठिकाणी संथ गतीने काम सुरु आहे.सदर सर्व पंप सुरू करावे. ऑनलाईन लाईन चे काम जलदगतीने पूर्णत्वास नेवून जिल्हयात २४ तास सीएनजी पूरवठा करण्याच्या मागणीसाठी सीएनजी वाहनधारकांनी नाशिक येथील कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
त्रंबक नाक्यावरील पंपावर टोकण शिवाय गॅस नाही बाहेरील ग्राहकांची गैरसोय
शहरातील त्रंबक नाक्यावरील पंपावर आदल्या दिवशी टोकण वाटप होत असून दुसऱ्या दिवशी गॅस चे वितरण होते मात्र यामुळे शहरा बाहेरील ग्राहकांना गॅस मिळत नाही येथे लाईन मध्ये गाडी उभी केल्यास ग्राहकांना अपमानास्पद वागणूक दिली जाते तर दुसरीकडे मात्र दुसऱ्या गेट ने आलेल्या काही व्हीआयपी ग्राहकांना विना टोकण गॅस भरून दिला जात असल्याच्या तक्रारी आहे.काही ग्राहकांनी येथील व्यवस्थापनाबाबत कंपनीकडे तक्रार केली आहे.