मुंबई – मुख्यमंत्री कार्यालयाने केलेल्या एका ट्विटमुळे राज्यात मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या ट्विटमध्ये औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे लिहीण्यात आले आहे. या नामांतरावरुन यापूर्वीच भाजपसह महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने टिका केली आहे. नाव बदलून विकास होत नसल्याचेही म्हटले आहे. म्हणजेच, जी बाब वादात असताना त्यासंबंधीत थेट मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट केल्याने आता सरकारवर जोरदार हल्लाबोल होण्याची चिन्हे आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयाने केलेले ट्विट असे
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1346797864572301314