गोदावरी घनवट (प्रथम) श्रावणी वाघ (व्दितीय) अभिषेक जांगिड (तृतीय)
———–
नाशिक – कोलकाता येथील दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंसऑफ इंडिया ( The Institute of Cost and Management Accountants of India) तर्फे संपूर्ण भारतभर घेतल्या जाणाऱ्या CMA Foundation September 2020 या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन या परीक्षेत नाशिक शाखेच्याच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत याही वर्षी घवघवीत यश संपादन केले आहे. वाणिज्य मधील सर्वोच अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या सीएमए. (CMA) परीक्षेतील या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
कॉस्ट (Cost) अकाउंटंस (Accountants) या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षांचे आयोजन हे केंद्र सरकारच्या दी इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटेंट्स ऑफ इंडिया (ICMAI) या संस्थेच्या वतीने केले जाते. दी इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटेंट्स ऑफ इंडिया च्या वतीने १२ वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वप्रथम फाउंडेशन (Foundation) ही परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे पुढिल इंटरमेडिएट (Intermediate) परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरतात. दी इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटेंट्स ऑफ इंडियातर्फे ६ सप्टेबर मध्ये अखिल भारतीय स्तरावर ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षांचा निकाल २० सप्टेबर रोजी जाहीर झाला.
या परीक्षांचा नाशिक विभागाचा निकाल
नाशिक विभागातून फाउंडेशनसाठी एकुण ३८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २४विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. कुमारी गोदावरी घनवट ही विद्यार्थी नाशिक जिल्ह्यात प्रथम आली असुन श्रावणी वाघ ही दुसऱ्या व अभिषेक जांगिड हा जिल्ह्यात तिसरा आला आहे.
(ICMAI) आयसीएमअेआयच्या नाशिक चॅप्टरचे अध्यक्ष कैलास शिदे, उपाध्यक्ष अर्पिता फेगड़े, स्वप्निल खराडे,
मयुर निकम ,खजिनदार दीपक जगताप, सभासद भुषण पागेरे, दीपक जोशी, निखिल पवार, आरिफ़ मंसूरी
यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनन्दन व पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.
नवीन ऍडमिशन देखील सुरु
सीएमए(CMA) कोर्ससाठी नवीन ऍडमिशन देखील सुरु झाले आहे.
अधिक माहितीसाठी 0235-2500150/2509989 | www.icmai.in | nasik@icmai.in येथे संपर्क करावा.