कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोल्हापूर पोटनिवडणुकीचा प्रचार आज संपत असल्याने यानिमित्त आयोजित ऑनलाईन प्रचार सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष असलेल्या भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात अतिशय आक्रमकपणे भाजपच्या प्रचाराला उत्तर देताना जोरदार टीकाही केली. त्यामुळे हे भाषण सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे असे
– देशात भाजपने बनावट हिंदुह्रदयसम्राट बनविण्याचा केलाला प्रयत्न फसला आहे. लोकांनीच हा प्रयत्न हाणून पाडला
– भाजपचा भगवा हा नकली बुरखा असून तो फायाडला हवा
– देशात गॅस आणि इंधनाच्या किंमती एवढ्या वाढत आहेत, त्यावर एकही भाजप नेता का बोलत नाही
– बाळासाहेब ठाकरेंचा आदर आहे असे सांगणाऱ्यांनीच नवी मुबई विमानतळाला त्यांचे नाव देण्यावेळी विरोध दर्शविला
– समृद्धी महामार्गाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव महाविकास आघाडी सरकारने दिले आहे
– शिवसेनेने स्थापनेपासून झेंडा कधीही बदलला नाही. नेताही बदलला नाही
– बेळगावमध्ये भाजपने नकली भगवा चढवला
– खोटं बोलूनच चार राज्यात सत्ता मिळवली. महाराष्ट्रात हे चालणार नाही
– मोदी सोडले तर कोणत्याही नेत्याचे फोटो पक्षाच्या बॅनरवर नसतात. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत की एखाद्या गावाचे सरपंच हेच समजत नाही
– कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या जयश्री जाधवच जिंकतील
– खोटं बोल पण रेटून बोल असे विरोधक आहेत
– शिवसेना समोरुन वार करते. भाजप मात्र पाठीमागून वार करते
–