नवी दिल्ली – शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत सूचक विधान केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री यांनी पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचे ऐकावे अन्यथा… असा बोलण्याचा राऊत यांचा रोख होता. त्यास काही तास उलचत नाही तोच आता सोशल मिडियात एक फोटो व्हायरल झाला आहे. नक्षलवादविरोधी कृती समितीची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. त्यास महाराष्ट्रासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर शहा हे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासबोत भोजन करीत असल्याचा हा फोटो आहे. याप्रसंगी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे सुद्धा उपस्थित होते. गल्लीत राऊतांचे विधान आणि दिल्लीत उद्धव यांचे अमित शहा यांच्याबरोबर भोजन ही बाब सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेची ठरत आहे.