मुंबई – राज्यात उद्या (१४ एप्रिल) रात्री ८ वाजेपासून पुढील १५ दिवसांसाठी कलम १४४ लागू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आज त्यांनी राज्याला संबोधून भाषण केले. यावेळी त्यांनी राज्यातील संकटाची माहिती दिली. ठाकरे म्हणाले की, कोरोना प्रादुर्भावाची स्थिती बिकट आहे. बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात रस्त्याने ऑक्सिजन आणणे कठीण होते आहे. हवाई वाहतुकीने ऑक्सिजन राज्यात आणण्याची गरज आहे. हवाई दलाची त्यासाठी मदत आवश्यक आहे. यासाठी पंतप्रधानांना विनंती करणार आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.facebook.com/CMOMaharashtra/videos/3859422447468520/
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की
-
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
-
कोरोनाचा फैलाव प्रचंड झाला आहे.
-
राज्यात बेड मिळत नाहीत
-
रेमडेसिव्हिरची मागणी प्रचंड वाढली आहे.
-
ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतो आहे
-
सर्वतोपरी आरोग्य सुविधा पुरवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. मात्र, प्रादुर्भाव खुपच वाढला आहे.
-
कोरोनामुळे आरोग्य सुविधांवर प्रचंड ताण आला आहे.
-
सध्याची वेळ निघून गेली तर अवस्था कठीण
-
राज्यात आज ६० हजार रुग्णांची नोंद
-
ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा हवा आहे. बंगालपासून अनेक राज्यांमधून आणत आहोत
-
रस्त्याने ऑक्सिजन आणणे कठीण होते आहे. हवाई वाहतुकीने ऑक्सिजन राज्यात आणण्याची गरज. हवाई दलाची मदत आवश्यक. पंतप्रधानांना यासाठी विनंती करणार.
-
कोरोना ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्याच निकषांनुसार मदत होणे गरजेचे
-
नैसर्गिक आपत्तीत जी मदत करतो तीच आता करणे आवश्यक. ज्यांची रोजीरोटी गेली त्यांच्यासाठी आपल्याला मदत करावी लागेल. पंतप्रधानांनी याचा विचार करावा
-
पंतप्रधानांनी लसीकरण महोत्सव करण्याचे सांगितले. देशात आपण सर्वाधिक लस देत आहोत
-
ब्रिटनने कडक लॉकडाऊन करुन लसीकरणावर मोठा भर दिला. नागरिकांना सुरक्षित केले. तिथे कोरोना आटोक्यात. आपल्यालाही तसेच करावे लागेल
-
पुढची लाट थोपविण्यासाठी आपल्याला नियोजन करावे लागेल. लसीकरणाला वेग देऊ
-
यावेळची लाट अतिशय भयानक. रुग्णवाढीतून ते दिसते आहे.
-
आपल्याला ही लढाई जिंकायची आहे
-
आपण आणखी आरोग्य सुविधा वाढवित आहोत. पण, मनुष्यबळ हवे आहे. निवृत्त डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, नुकतेच उत्तीर्ण झालेले डॉक्टर या सर्वांना आम्ही कळकळीची विनंती करतो. त्यांनी सेवेत यावे. वेळ आली आहे. तुम्ही सरकार सोबत या.
-
ही उणी दुणी काढण्याची वेळ नाही. कृपया राजकारण नको. महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही
-
जर ही साथ आहे तर आपण एकसाथ यायला हवे
-
यापूर्वी अनेकदा इशारा, कल्पना दिली पण उपयोग झाला नाही आता कडक निर्बंधांची वेळ आली आहे
-
लॉकडाऊन नाही तर अतिशय कडक निर्बंध गरजेचे
-
जीव वाचवणे हिच आताची सर्वप्रथम गरज आहे
-
उद्या सायंकाळी ८ वाजेपासून निर्बंध लागू होतील
-
सर्व आस्थापना बंद राहणार. सरकारी व खासगी. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील
-
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू राहणार. अतिआवश्यक कामासाठीच त्या सुरू राहणार
-
कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही
-
पेट्रोल पंप, कार्गो सेवा सुरू राहणार
-
हॉटेल, रेस्टॉरंट केवळ पार्सल देतील
-
रस्त्यावरचे खाद्य पदार्थ विक्री होतील पण केवळ पार्सल मिळेल (सकाळी ७ ते रात्री ८)
-
अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना ३ किलो गहू व २ किलो तांदूळ महिनाभर मोफत देणार आहोत. रोजी थांबली तरी रोटी देणार आहोत. ७ कोटी जणांना हा लाभ होईल.
-
शिवभोजन थाळी – पुढील एक महिना मोफत असेल. गोरगरिबांसाठी
-
गरिबांची रोजी मंदावणार पण जेवणाची सुविधा आपण करीत आहोत
-
२ महिन्यांसाठी १ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देणार. एकूण ३५ लाख जणांना लाभ मिळणार. संजय गांधी निराधारसह अन्य योजनांद्वारे ही मदत मिळणार. हे पैसे आगाऊ देणार
-
इमारत कामगार कल्याण मंडळ – बांधकाम कामगारांना १५०० रुपये अर्थसहाय्य देऊ. १२ लाख लाभार्थ्यांना फायदा होईल
-
घरेलु कामगार – नोंदणीकृत जे आहेत त्यांनाही १५०० रुपये देणार
-
अधिकृत फेरीवाल्यांना १५०० रुपये प्रत्येकी देणार. ५ लाख लाभार्थी आहेत
-
परवानाधारक रिक्षाचालकांना १५०० रुपये दिले जातील. १२ लाख लाभार्थी आहेत
-
सर्वांना थेट बँकेत पैसे मिळणार
-
आदिवासी खावटी योजनेद्वारे २ हजार रुपये दिले जातील. १२ लाख लाभार्थी आहेत
-
कोविडसाठी ३ हजार ३०० कोटींचा निधी असणार
-
मदतीसाठी ५ हजार ४०० कोटी रुपये राज्य सरकार देणार
-
जीव वाचविण्यासाठी हे निर्बंध लावण्यात येत आहेत.
-
हे आदेश काढताना कुठलाही आनंद होत नाहीय
-
नागरिकांच्या बांधिलकीशी समजून निर्णय घेत आहोत. लढाई आपल्याला जिंकायची आहे.
-
कृपया सरकारला सहकार्य करा