मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी आज संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधितांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे कोरोनाची राज्यात सद्यस्थिती काय आहे, आगामी काळात काय नियोजन आहे, राज्यात कडक लॉकडाऊन लावल्याचा काय परिणाम झाला आदींबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच, मराठा आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबतही त्यांनी भाष्य केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की
-
लसीचा पुरवठा हळूहळू वाढतो आहे. दिवसाला ५ लाख जणांना आपण लस दिली आहे. त्यापेक्षा अधिक देऊ
-
केंद्राला कालच पत्र दिले आणखी ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी केली
-
रुग्णवाढ मंदावत असली तरी गाफील बिल्कुल राहू नका
-
महाराष्ट्र अजूनही धोक्याच्या वळणावर आहे
-
तिसऱ्या लाटेसाठी सज्ज रहा असे शास्त्रज्ञांनी, तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यादृष्टीने आपण नियोजन करीत आहोत
-
आपण अनेक पातळ्यांवर सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती सुरू होईल
-
आपण मिशन ऑक्सिजन हाती घेतले आहे
-
रेमडेसिविरच्या कोट्यात हळूहळू वाढ होते आहे. राज्यात कमी-अधिक पुरवठ्याची तक्रार आहे. पण ती दूर होईल
-
रुग्ण बाधित झाला आणि घरीच तो काय उपचार घेऊ शकतो, यावरही आपण भर देतो आहे
-
मराठा आरक्षणाचा कायदा आपण सर्वानुमते संमत केला. तोच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला
-
आपण लढाई समर्थपणाने लढलो. पण पदरी निराशा आली
-
मराठा समाजाने समंजसपणाने हा निर्णय समजून घेतला. कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही
-
सरकार लढते आहे. आपण ठाम बाजू मांडली पण असे का झाले, याचा अभ्यास सुरू आहे
-
अजूनही लढाई संपलेली नाही. यापुढेही आपण लढणार आहोत
-
न्यायालयाने पुढचा मार्ग दाखविला आहे. आरक्षणाचा अधिकार केंद्र व राष्ट्रपतींचा आहे.
-
पंतप्रधान व राष्ट्रपतींना हात जोडून विनंती केली आहे, करतो आहे
-
जम्मू काश्मिरचे कलम ३७० हटविताना जो समंजसपणा दाखविला तो आताही केंद्राने दाखवावा, अशी कळकळीची विनंती आहे
-
मराठा आरक्षणासाठी आजही सर्व पक्ष एकत्र आहेत. त्या सर्वांची एकमुखी मागणी आहे
-
केंद्र सरकारने आता कृपया वेळ घालवू नये
-
ज्येष्ठ विधीज्ञांची फौज कामाला लागली आहे. आणखी काही मार्ग आहेत का तेही जाणून घेऊ
-
केंद्राच्या अधिकारावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे
-
ही मागणी केवळ एका समाजाची नाही तर ती न्याय, हक्काची आहे
-
या मागणीचा अनादर पंतप्रधान, राष्ट्रपती करणार नाहीत, असा ठाम विश्वास आहे
-
कोरोनाची लढाई आणि समाजविघातक व्यक्तींच्या विरोधात आपल्याला लढायचे आहे
- https://twitter.com/CMOMaharashtra/status/1389958161717555207