कोल्हापूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत. अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच ते कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. मात्र, खराब हवामानामुळे त्यांचा दौरा रद्द झाला होता. आता मात्र, हवामान चांगले असल्याने ते कोल्हापुरात दाखल झाले आहेत. त्यांच्यासमवेत पालकमंत्री हसन मुश्रीफ हे सुद्धा आहेत. पूर परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी, नागरिकांच्या अडी-अडचणी ते जाणून घेणार आहेत. त्यानंतर कोल्हापुरातील सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत ते आढावा बैठक घेणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल. पूर परिस्थितीची पाहणी व प्रशासनासमवेत आढावा बैठक घेतील pic.twitter.com/o9mvHa9NIW
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 30, 2021