विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच, वाढदिवसानिमित्त त्यांनी राज्यपालांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात मोठा वाद आहे. सुप्त संघर्षामुळे सातत्याने ही बाब चर्चेत राहते. महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ सदस्यांची यादी राज्यपालांकडे सादर केली आहे. त्यास अनेक महिने झाले तरी राज्यपालांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळेच सातत्याने संघर्ष होताना दिसत आहे. अशातच आज मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राजभवन येथे राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी जी यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचे अभिष्टचिंतन केले. pic.twitter.com/6ffWBCbd89
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) June 17, 2021