निलेश गौतम, सटाणा
आज गारपीट ग्रस्त मोसम खोऱ्यातील गावांची पाहणी करण्यास आलेले राज्याचे मुख्यमंत्री यांचा दौरा संपतो न संपतो तितक्यात आलेल्या वादळी पावसाने आरम खोऱ्यातील शेतपिके जमीन दोस्त केली आहेत. वादळी वाऱ्यासह गारपीट व जोरदार झालेल्या पावसाने पिकांची वाताहत केली असुन शेतकरी पुर्णपणे उध्वस्त झाला आहे.
आज सायंकाळी 6 च्या सुमारास आलेल्या या पावसाने डांगसौंदाणेसह जोरण, किकवारी, कपालेश्वर, तळवाडे, साकोडे परिसरात जोरदार हजेरी लावली सुमारे एक तास हुन अधिक झालेल्या या पावसाने उन्हाळी कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. तर उन्हाळी बाजरी भुईसपाट झाली आहे, अनेक ठिकणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.
काही ठिकणी विजवीतरण चे विद्युत पोल पडले आहेत . काहींचे टोम्याटो, मिरची, कलिंगड पिके या पाण्याने उध्वस्त केली असुन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सर्विकडे उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम सुरू असुन अनेकांची कांदे जमिनीत आहेत तर काढणी केलेल्या कांद्या वरील प्लास्टिक ताडपत्री उडून गेल्याने कांदा ओला झाला आहे.
या पावसाने सर्वाधिक नुकसान कांद्याचे झाले आहे तर मक्याचा साठवून ठेवलेला चारा पूर्णपणे भिजला आहे अवकाळी ने शेकऱ्यांचे पूर्णपणे कंबरडे मोडले असुन शेतपिकांचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी बाजार समितीचे संचालक संजय सोनवणे यांनी केली आहे.
CM Tour Satana Taluka Hailstorm Crop Loss