मुंबई – मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरतीचा कारभार गाजला. MPSC मार्फत सरळसेवा भरती केली जाते. यासाठी काही विभागांकडून अद्यापपर्यंत आयोगाला मागणीपत्र सादर करण्यात आलेले नाही. त्याबाबत MPSCनेही फारशी हालचाल केली नाही. तसेच, या विभागांचा हलगर्जीपणाही कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले. याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. याविषयी मुख्यमंत्र्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच, कोणत्याही परिस्थितीत ३० सप्टेंबरपर्यंत मागणीपत्र पाठविण्याचे त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सचिवांना निर्देश दिले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा भरतीसाठी काही विभागांकडून अद्यापपर्यंत मागणीपत्र आयोगाला न सादर झाल्याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून कोणत्याही परिस्थितीत ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत सर्व विभागांनी मंजूर पदांचा तात्काळ आढावा घेऊन आपले मागणीपत्र आयोगाकडे पाठवावे असे स्पष्ट निर्देश श्री.ठाकरे यांनी सर्व विभागांच्या सचिवांना दिले. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला दुजोरा देत तातडीने ही कार्यवाही झाली पाहिजे असे सांगितले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (#MPSC) सरळसेवा भरतीसाठी काही विभागांकडून अद्यापपर्यंत मागणीपत्र आयोगाला न सादर झाल्याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत ३० सप्टेंबरपर्यंत मागणीपत्र पाठविण्याचे त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सचिवांना निर्देश दिले. pic.twitter.com/Pr8jHKUcvc
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 22, 2021