मुंबई – राज्यातील महिलांवरील अत्याचार आणि त्यांची सुरक्षा यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले. यासंदर्भात विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी त्यांनी केली. या पत्राला मुख्यमंत्री ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. देशातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे विशेष सत्र बोलवण्याची मागणी मा. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान व गृहमंत्री यांच्याकडेच करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यपालांच्या पत्राला उत्तर देताना केली आहे.