विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रीमंडळातील डझनभर मंत्री राजभवनावर पोहचले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांच्यासमवेत त्यांची भेट घेतली. यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधून भेटीचे कारण स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी या बैठकीला उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले की, मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयानस जो निकाल दिला त्यासंदर्भात राज्यपालांची भेट घेतली. त्या निकालात आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना नसून राष्ट्रपतींना आहेत, असं सांगण्यात आलं. आमच्या भावना राज्यपालांना कळवण्यासाठी आम्ही भेट घेतली. भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत. आम्ही राज्यपालांना विनंती केली की त्यांनी पंतप्रधान व राष्ट्रपती यांना मराठा आरक्षणाबाबत आग्रह धरावा.