अयोध्या (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अयोध्या येथे ‘प्रभु श्री रामचंद्रा’च्या जन्मस्थळी दर्शन घेतले. मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे आज अयोध्येत आगमन झाले असून यावेळी उभयतांचे शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेशचे मंत्री, महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार यासह स्थानिक भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अयोध्येतील मंदीरात ‘प्रभु श्री रामचंद्रांचे’ दर्शन घेतले तसेच यावेळी झालेल्या महाआरतीत सहभागी झाले. यानंतर अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या राम मंदिर परिसराला मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी करून मंदीराच्या बांधकामाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.
याप्रसंगी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील , ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे , अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, कामगार मंत्री सुरेश खाडे, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत यासोबत खासदार सर्वश्री राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, कृपाल तुमाणे, सदाशिव लोखंडे, श्रीरंग बारणे आदी उपस्थित होते.
यानंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षातील सर्व सहकारी मंत्री आणि आमदार यांच्यासह प्रभू श्रीरामाचे जन्मस्थळ असलेल्या रामलल्लाच्या मंदिरात महाआरती केली. pic.twitter.com/QyLLGQgdJB
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 9, 2023
CM Shinde DYCM Fadnavis Ayodhya Ram Darshan