सोमवार, जून 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सातारा जिल्ह्याच्या पर्यटन विकासाबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतले हे मोठे निर्णय

by India Darpan
नोव्हेंबर 1, 2022 | 5:21 am
in राज्य
0
10 6 750x375 1

 

सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या दरे (ता. महाबळेश्वर) दौऱ्यावर आहेत. त्यांनी महाबळेश्वर, पाचगणीसह सातारा जिल्ह्यातील क वर्ग पर्यटन तसेच धार्मिक व यात्रा स्थळांच्या विकास कामांचा आढावा घेतला. दरे ता. महाबळेश्वर येथील निवासस्थानी जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील पर्यटन व धार्मिक स्थळांच्या विकास कामांची माहिती दिली. या प्रसंगी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समिर शेख आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, जिल्ह्यातील ज्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. त्या ठिकाणी पर्यटकांना आणखी चांगल्या सुविधा निर्माण कराव्या. तसेच महाबळेश्वर, पाचगणी व्यतिरिक्त क वर्ग पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे क वर्ग पयर्टन स्थळांना चांगल्या सुविधा देण्यात येईल. जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव आहे त्यामुळे इतर ठिकाणीही पर्यटन वाढीसाठी आराखडा तयार करावा.
जिल्ह्यात विविध यात्रा व उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येतात. या यात्रा व उत्साहांना राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. यांच्या सुविधेसाठीही निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

महाबळेश्वर, पाचगणीसह जिल्ह्यातील 27 क वर्ग पर्यटन स्थळांबरोबर धार्मिक, यात्रा स्थळांचा या आराखड्यामध्ये समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या पर्यटन विकास आराखड्याबाबत समाधान व्यक्त करुन श्री. शिंदे म्हणाले, या आराखड्यामध्ये स्थानिकांना रोजगार व पर्यटकांसाठी उभारण्यात येणाऱ्या सुविधांसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. तसेच कोयना जलाशयाच्या ठिकाणी हाऊस बोट सारखी सुविधा निर्माण करण्याच्या सूचना करुन जिल्हा प्रशासनाकडून सादर करण्यात येणाऱ्या उपक्रमांना निधी तातडीने दिला जाईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

कास परिसरात फुलांचा हंगाम असल्यावरच पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. परंतु हे पर्यटक कास परिसरात बारमाही येण्यासाठी सुविधा वाढविण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी सुचविलेल्या उपाययोजनांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सकारात्मकता दर्शवली तसेच सातारा येथील अजिंक्यतारा व महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगड किल्ला संवर्धनासाठी वास्तुविशारद नेमावा यासाठीही निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशीही ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.

CM Review Meet Satara Tourism Development
Eknath Shinde

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आजपासून बदलणार हे नियम; जाणून घ्या, अन्यथा तुम्हाला पडेल महागात

Next Post

राजू श्रीवास्तव यांच्या आठवणीत पत्नी भावूक; शेअर केला कॉमेडियनचा कधीही न पाहिलेला व्हिडीओ

Next Post
Shikha Raju Shrivastav

राजू श्रीवास्तव यांच्या आठवणीत पत्नी भावूक; शेअर केला कॉमेडियनचा कधीही न पाहिलेला व्हिडीओ

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी भूलथापांवर विश्वास ठेवू नये, सत्यता तपासावी, जाणून घ्या, मंगळवार, १० जूनचे राशिभविष्य

जून 9, 2025
mudrank

मुद्रांक शुल्क़ अभय योजनेस मुदतवाढ मिळणार….

जून 9, 2025
crime1

पोलीसात तक्रार देण्यासाठी निघालेल्या बापलेकावर धारदार कोयत्याने हल्ला…चार जणांविरोधात गुन्हा दाखल

जून 9, 2025
Untitled 35

वाहन धारकांनी या तारखेपर्यंत एच.एस.आर.पी नंबर प्लेट बसवावी….

जून 9, 2025
mahavitarn

महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना…तिसरा व अंतिम लकी ड्रॉ या तारखेला

जून 9, 2025
rain1

मान्सून सक्रिय…पाच दिवसा दरम्यान महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता

जून 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011