शुक्रवार, ऑक्टोबर 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मुख्यमंत्री सहायता निधी आता एका क्लिकरवर… व्हॉटसॲप हेल्पलाईन आणि मोबाईल ॲप सुरू… असा घ्या लाभ…

ऑगस्ट 15, 2023 | 7:15 pm
in राज्य
0
F3kzX50agAEq6n0 e1692106945512

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या लाभार्थींसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्स ॲप हेल्पलाईनचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आला. याचवेळी दुर्धर व गंभीर आजारांवर यशस्वी मात केलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा आनंद मेळा सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, श्रीमती चित्रा वाघ, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत एक वर्ष एक महिन्यात १२ हजार ५०० रुग्णांना लाभ देण्यात आला. यासाठी १०० कोटीपेक्षा अधिक अर्थसहाय्य वितरित करण्यात आल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी वैद्यकीय मदत मार्गदर्शक ग्रंथाच्या पाचव्या आवृत्तीचे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर आधारित ‘रोखठोक’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. या आनंद मेळाव्यात मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे आम्हाला पुनर्जन्म लाभला अशा भावना यावेळी व्यक्त केल्या. मुख्यमंत्री सहायता कक्षामार्फत एक वर्षातील आढावा घेणारी चित्रफित यावेळी दाखवण्यात आली.

मदतीचा हात पुढे करताना मोजमाप नाही – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्यातील प्रत्येक नागरिकाला सर्व शासकीय रुग्णालयांत मोफत तपासणी आणि उपचार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी आजपासून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत वर्षभरात रुग्णांना मदत करत करत शंभर कोटींचा आकडा कधी पोहोचला हे समजलेसुद्धा नाही. मदतीचा हात जेव्हा मी पुढे करतो तेव्हा मी यामध्ये मोजमाप करत नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा माझा जिव्हाळ्याचा विषय असून काही गोष्टी निकषात बसत नाहीत, मात्र वैद्यकीय मदतीचा विषय असल्याने त्यात मार्ग काढला जातो. आमचं सरकार आल्यापासून मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीपासून शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, यापैकी कुठलाही घटक लाभापासून, योजनांपासून वंचित राहणार नाही, अशा प्रकारची काळजी घेण्याचे काम या सरकारने केले आहे.

आपल्याला जो काही अधिकार प्राप्त झाला आहे त्याचा वापर सर्वसामान्य लोकांसाठी झाला पाहिजे. एक सही एखाद्याला उपचार देत असेल, त्याचा जीव वाचत असेल तर मला अशा कितीही सह्या केल्या तरी कमीच वाटतात असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
अधिकारांचा वापर सर्वसामान्यांसाठी करतो. सामान्यांसाठी केलेल्या सह्या कमीच वाटतात. कोरोना काळात आपली माणसं परकी झाली होती. या परिस्थितीमध्ये कोरोना काळात एक टीम म्हणून काम केलं. कुठल्याही संकट समयी मदत करताना मोजमाप केलं नाही असेही त्यांनी सांगितले.

श्री. शिंदे म्हणाले, महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत विमा संरक्षण दीड लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढविण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकासाठी ही योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. रखडलेले प्रकल्प देखील पुढे नेण्याचं काम हे शासनाच्या माध्यमातून आपण करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात गोरगरीब लोकांसाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू केली. याचा लाभ मोठ्या प्रमाणात रुग्णांना होत आहे. महाराष्ट्र आज विदेशी थेट गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आले असून त्यामुळे राज्यात रोजगार मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना, स्वतः सेवेचे दूत बनून लोकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी राज्यातील एकही रुग्ण हा रुग्णसेवेपासून वंचित राहणार नाही असे यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी
व्हॉट्सॲप चॅटबॉट क्र. +९१ ८६५०५ ६७५६७
ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://play.google.com/store/apps/details?id=com.etech.cmrelief

CM Relief Fund Medical Help WhatsApp helpline Mobile App
Patient Health Hospital CMO Chief Minister Service

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अहमदनगर शहरात लागले एवढे सीसीटीव्ही… दुसऱ्या टप्प्यात इतके लागणार…

Next Post

शरद पवारांच्या संभ्रम राजकारणाला ठाकरे, काँग्रेस वैतागले… असा सुरू आहे प्लॅन…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
MVA Meeting1 e1678431568541

शरद पवारांच्या संभ्रम राजकारणाला ठाकरे, काँग्रेस वैतागले... असा सुरू आहे प्लॅन...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011