इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हिंदी भाषा आणि त्रिभाषा सुत्रावर राज्य सरकारने काढलेले दोन्ही जीआर रद्द केल्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या संदर्भात डॅा. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येणार असून त्याच्या अहवालानंतर यावर निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मंत्रिमंडळात आम्ही चर्चा केली आणि निर्णय केला आहे. कुठल्या वर्गापासून लागू करावी, काय चॅाईस द्याव त्यावर डॅा.नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक कमिटी स्थापन करण्याचा निर्णय झाला. त्यामध्ये इतरही काही सदस्य आणखी असतील. या समितीच्या आधारेच त्रिभाषा सूत्र लागू केले जाईल. आम्ही दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेत आहोत.
नरेंद्र जाधव समिती ही माशलेकर समितीचा अभ्यास करेल. सोबतच सर्वांचे म्हणणे समिती एेकून घेईल आणि नंतरच राज्य सरकार निर्णय स्विकारेल. यावेळी अजित पवार यांनी राज्य सरकारने दोन्ही जीआर रद्द केले आहेत. त्यामुळे ५ जुलै रोजी काढण्यात येणारा मोर्चा काढू नये असे आवाहन केले.