सांगली –दुकानांच्या वेळेबाबत आज आदेश काढणार, रुग्णसंख्या कमी असलेल्या झोनमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवता येणार आहे. लोकलमध्ये तूर्तास सर्वांना प्रवेश देणे शक्य नाही अशी माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगली येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. आज जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सांगली दौ-यावर आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
या दौ-यात पलूस तालुक्यातील भिलवडी व अंकलखोप येथील पूरबाधित गावांची पाहणी करुन नागरिकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. तुमच्या सर्वांच्या साथीने यातून मार्ग काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. या दौ-यात मुख्यमंत्री यांनी पूरपरिस्थीतीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची माझी तयारी आहे. तुमची त्यासाठी तयारी आहे का ? असा प्रश्न करत पुनर्वसन करावे लागेल. त्यासाठी कटू निर्णय घ्यावे लागतील असे सांगितले.
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पलूस तालुक्यातील भिलवडी व अंकलखोप येथील पूरबाधित गावांची पाहणी करुन नागरिकांशी संवाद साधला. तुमच्या सर्वांच्या साथीने यातून मार्ग काढणार आहे- मुख्यमंत्री pic.twitter.com/wWGMOjCs7O
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 2, 2021