इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नागपूर येथील मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या व्यापक बैठकीत नाशिकला जोडणा-या महत्त्वाचे आठ मार्ग व त्याला जोडून नाशिकमधील व जिल्ह्यातील अंतर्गत सर्व रस्त्यांच्या विकासासंदर्भात बैठकीत विचार करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जवळपास सर्व रस्त्यांना तत्वतः मान्यता दिलेली आहे. लवकरच त्यासाठी करून त्याला निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि ते काम पूर्ण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
कुंभच्याकाळात जी काही प्रचंड मोठी ट्रॅफिक अपेक्षित आहे त्या ट्रॅफिक करता विस्तारित रस्त्यांचे जाळे यातून उपलब्ध होणार असल्याने भक्तांना अधिक सुरक्षित सुविधा उपलब्ध होतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या बैठकीत नाशिक रिंगरोडला मंजुरी देण्यात आली. याचबरोबर नाशिक ते त्र्यंबक सहापदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नाशिक येथील वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रामुख्याने द्वारका सर्कल येथील सुविधा भक्कम करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. कळंबोली जंक्शनच्या धरतीवर द्वारका सर्कलचा विकास दोन टप्प्यात करण्याचा निर्णय झाला. यात कुंभपर्यंत होणारे काम व कुंभनंतर हाती घ्यावयाचे काम असे दोन टप्पे ठरविण्यात आले.
या मार्गाचा होणार विकास
१) घोटी – पाहिने – त्रिंबकेश्वर – जव्हार फाटा
२) द्वारका सर्कल – सिन्नर आयसी २१ (समृद्धी एक्सप्रेसवे) नांदूर शिंगोटे – कोल्हार
३) नाशिक ते कसारा
४) सावली विहीर (आय सी २० समृद्धी एक्सप्रेसवे) शिर्डी – शनिशिंगणापूर फाटा ( राहुरी खुर्द)
५) नाशिक ते धुळे
६) त्र्यंबकेश्वर – जव्हार – मनोर
७) सावली विहीर – मनमाड – मालेगाव
८) घोटी – सिन्नर – वावी – शिर्डी
९) शनिशिंगणापूर फाटा (राहुरी खुर्द) – अहिल्यानगर (खरवंडी फाटा)