मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांकरिता नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. आज मालेगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कॅम्प पोलीस ठाणे व २०५ पोलीस निवासस्थाने यांच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी त्यांनी कायदा-सुव्यवस्थेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करण्यात येईल असे सांगितले. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या काष्टी (मालेगाव) येथील कृषी विज्ञान संकुलाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण मुख्यमंत्री यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार दादा भुसे उपस्थित होते.
शुक्रवारी मुख्यमंत्री यांनी मुंबईहून मालेगाव (जि.नाशिक) कडे प्रयाण केले. त्यांचे इगतपुरी, घोटी, नाशिक येथे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते मालेगाव येथे शुक्रवारी मुक्कामी राहिले. आज शनिवार मालेगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकासकामांबाबत आढावा बैठक होईल. तसेच त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन संपन्न झाला. त्यांची या ठिकाणी सभा होईल. त्यानंतर मनमाड येथे ते जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री औरंगाबादकडे रवाना होणार असून तेथे त्यांचा मुक्काम असणार आहे.
मालेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कॅम्प पोलीस ठाणे व २०५ पोलीस निवासस्थाने यांच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते झाला. कायदा-सुव्यवस्थेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करण्यात येईल – मुख्यमंत्री pic.twitter.com/Gn7PRMjEJT
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 30, 2022
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या काष्टी (मालेगाव) येथील कृषी विज्ञान संकुलाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार @dadajibhuse उपस्थित होते. pic.twitter.com/GTHDANqnt0
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 30, 2022