इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या मृत्यूसंदर्भात स्थापन केलेल्या चौकशी समितीने त्यांचा अहवाल सादर केला आहे. जयललिता यांचा मृत्यू कसा आणि कोणामुळे झाला याचा खुलासा यातून झाला आहे. या समितीने जयललिता यांच्या मृत्यूला जयललिता यांच्या सहकारी व्ही के शशिकला यांना दोषी ठरवले आहे.
२०१६ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या न्यायमूर्ती ए अरुमुघस्वामी चौकशी आयोगाने आपल्या शेवटच्या टिप्पण्यांमध्ये म्हटले आहे की व्ही के शशिकला यांचा दोष शोधला पाहिजे. समितीने त्यांच्या चौकशीची शिफारस केली आहे. तामिळनाडू सरकारने जयललिता यांच्या मृत्यूची परिस्थिती आणि २०१८ मध्ये थुथुकुडी येथे झालेल्या पोलिस गोळीबाराची चौकशी करणाऱ्या स्वतंत्र आयोगांचे अहवाल विधानसभेत सादर केले. शशिकला यांच्यासोबतच समितीनेने इतरांचीही नावे दिली आहेत.
२०१८ मध्ये स्टरलाइट विरोधी आंदोलकांवर थुथुकुडी येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबाराची चौकशी न्यायमूर्ती अरुणा जगदीसन आयोगाने केली. या अपघातात १३ जणांना आपला जीव गमवावा लागला. यासाठी आयोगाने पोलिस अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला आहे.
यापूर्वी २७ ऑगस्ट रोजी, आयोगाने आपला अहवाल मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांना सादर केला होता, ज्यात माजी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (एआयएडीएमके)च्या प्रमुख जयललिता यांच्या हॉस्पिटलायझेशन सभोवतालच्या परिस्थितीची माहिती दिली होती. द्रमुकच्या नेतृत्वाखालील सरकारने शशिकला यांच्यासह माजी मुख्य सचिव राम मोहन राव, माजी आरोग्य मंत्री सी विजयभास्कर आणि इतर काही जणांची चौकशी करावी, अशी शिफारस समितीने अहवालात करण्यात आली आहे.
राज्य मंत्रिमंडळाने ६०० पानांच्या अहवालावर चर्चा केली आणि शिफारशींबाबत कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करण्याचा निर्णय घेतला. द्रमुकने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात जयललिता यांच्या मृत्यूचे सत्य समोर आणण्याचे आश्वासन दिले होते.
जयललिता यांना २२ सप्टेंबर २०१६ रोजी चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ५ डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले. सुमारे ७५ दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते.
३० नोव्हेंबर २०२१ रोजी, सर्वोच्च न्यायालयाने अपोलो हॉस्पिटलच्या याचिकेवर सहमती दर्शवली आणि AIIMS ला अरुमुघस्वामी आयोगाला मदत करण्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे निर्देश दिले. २०१७ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या अरुमुघस्वामी आयोगाला २५ ऑगस्टपर्यंत आणखी एक मुदतवाढ मिळाली. २० ऑगस्ट रोजी एम्सच्या वैद्यकीय मंडळाने निष्कर्ष काढला की जयललिता यांना योग्य वैद्यकीय उपचार देण्यात आले होते आणि त्यांना मिळालेल्या थेरपीमध्ये कोणतीही त्रुटी नव्हती.
CM Jaylalita Death Case Enquiry Committee Report