अयोध्या (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहकारी मंत्री, पदाधिकारी आणि समर्थकांसह अयोध्येत दाखल झाले आहेत. उद्या सकाळी ते शरयू नदीची महाआरती करणार आहेत. तसेच, श्रीराम मंदिरात जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. राज्यात सत्तास्थापन केल्यानंतर प्रथमच शिंदे हे शक्तीप्रदर्शन करीत अयोध्येला गेले आहेत. त्यामुळे सगळ्यांचेच त्यांच्या या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे. अयोध्येत दाखल झाल्यानंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
बघा, ते काय म्हणाले याचा हा व्हिडिओ
https://twitter.com/mieknathshinde/status/1644708331788046337?s=20
https://twitter.com/BeldarKalpesh/status/1644708999823253504?s=20
CM Eknath Shinde with ministers in Ayodhya