गुरूवार, सप्टेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ज्या मंदिरात भविष्य पाहिले त्या मंदिराला ‘अंनिस’ने दिली तब्बल २१ लाखाची ऑफर!

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 25, 2022 | 12:53 pm
in संमिश्र वार्ता
0
Ishanyeshwar Temple Sinner

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंकाद्वारे भविष्य पाहणे हे शास्त्र आहे हे सिध्द करा व एकवीस लाख रुपये जिंका, असे खुले आणि थेट आव्हान अंधश्रद्धा निर्मुलन समितीने ईशान्येश्वेर संस्थानला दिले आहे. याच संस्थानमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांसोबत भविष्य पाहिल्याची चर्चा सध्या चालू आहे. त्यामुळे अंनिसचे हे आव्हान स्वीकारले जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ईशान्येश्वर मंदिरातील संबधीत व्यक्ती यांनी काल प्रसारमाध्यमांतून असे जाहिर केले की, सदर ठिकाणी कुंडली पाहिली जात नाही किंवा हात ही पाहिले जात नाही. त्यांचा हा दावा अंनिसला मान्य आहे. कारण संबधित व्यक्ती अंकशास्त्राचा आभ्यासक आहे. अंकशास्त्रात कुंडली अथवा हात पाहिला जात नाही. त्यांनी ज्योतिष पाहत असल्याचा दावा खोडून काढला नाही. ते अंकशास्त्राच्या आधारे भविष्य पाहत नसेल तर तसा फलक त्यांनी मंदिरात लावावा व जनता फसवणूकीपासून दुर राहावी म्हणुन तसे हमीपत्र लिहून द्यावे. अन्यथा अंकशास्त्र हे शास्त्र असल्याचे सिध्द करावे. तसे केल्यास अंनिस जनतेतून मिळविलेले एकवीस लाख रुपये त्यांना बक्षीस देईल, असे आव्हान महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री यांनी रुद्र पुजा करण्यास अंनिसचा विरोध नाही. भारतीय संविधानाने प्रत्येकास श्रद्धा व उपासनेचा आधिकार दिला आहे. परंतु संबधित व्यक्तीची ख्याती पहाता ही पुजा भविष्यातील अडचणीवर मात करण्यासाठी केलेला तोडगा असावा असे अंनिसला संशय आहे. कारण ही पुजा अमावस्येला केली गेली. इतकेच नव्हे तर ही पुजा करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी शिर्डीच्या नावाखाली दौरा आयोजित केला की काय अशी शंका उपस्थित होते. मुंबईच्या महत्त्वाच्या बैठका रद्द करून व गोपनीयता राखत प्रोटोकॉल तोडून हा दौरा झाला. मुख्यमंत्र्यांना रुद्र पुजा करायची तर मुंबईला अथवा कुठेही करु शकत होते. मात्र ईशान्येश्वर मंदिरात केली. कारण अंकशास्त्राच्या आधारे भविष्य पाहुन हा तोडगा केला असावा ,असा संशय आहे.

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी त्यांचा संबधित लोकांशी मैत्री होण्याचे गुपित उघड करावे. शिक्षणाच्या गाभा घटकात वैज्ञानिक दृष्टिकोनची निर्मिती करावे,असे सांगितले आहे. मात्र शिक्षणमंत्र्यांची ही कृती विद्यार्थ्यांना चुकीचा संदेश देते.हे पुरोगामी महाराष्ट्राला मागे नेणारे आहे. पालकमंत्री यांनी पूजेला अंधश्रद्धा म्हणणे चुकीचे असल्याचे सांगीतले आहे. महाराष्ट्र अंनिस सर्वांच्या श्रद्धा व उपासनेचा आदर करते परंतु कोणताही शास्त्रीय आधार नसलेल्या ज्योतिषाला विरोध करते. कारण ज्योतिष हे शास्त्र नसुन थोतांड आहे. ते स्वप्न विकण्याची कला आहे. जनतेने अशा लोकांपासून दुर रहावे व अंधानुकरण करू नये, असेही चांदगुडे यांनी म्हटले आहे.

CM Eknath Shinde Sinner Ishanyeshwar Temple

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधान पीक विमा योजनेत होणार मोठा बदल; बघा, केंद्रीय कृषीमंत्रालय काय म्हणाले..

Next Post

नवीन लाल कांद्याला सर्वोच्च ७१७१ रुपयांचा दर

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी नवीन कामे व प्रवास टाळावे, जाणून घ्या, गुरुवार, ११ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 10, 2025
IMG 20250910 WA0350 1
स्थानिक बातम्या

शिलापूर येथील सीपीआरआयच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

सप्टेंबर 10, 2025
Untitled 9
आत्महत्या

नर्तिकेसाठी वेडा झालेल्या उपसरंपचाची आत्महत्या…नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

सप्टेंबर 10, 2025
WhatsApp Image 2025 09 09 at 10.51.24 AM 1
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये या फाऊंडेनशतर्फे बंगाल फाईल्स चित्रपटाचे दोन शोज….८०० जणांची उपस्थिती

सप्टेंबर 10, 2025
rain1
संमिश्र वार्ता

राज्यात अशी असेल पावसाची स्थिती…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 10, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागात पार्क केलेल्या चार मोटारसायकली चोरीला

सप्टेंबर 10, 2025
crime 88
क्राईम डायरी

घरफोडीची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोडींमध्ये चार लाखाचा ऐवज लंपास

सप्टेंबर 10, 2025
crime11
क्राईम डायरी

फ्रॉडची ९ लाख ८० हजाराची रक्कम मुळ मालकास परत…नाशिकच्या सायबर शाखेस यश

सप्टेंबर 10, 2025
Next Post
IMG 20221125 WA0122 2 e1669362797685

नवीन लाल कांद्याला सर्वोच्च ७१७१ रुपयांचा दर

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011