निलेश गौतम, सटाणा
रामजन्मभूमीत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्याच दिवशी थेट बागलाण मधील शेतकऱ्याच्या बांधावर येत नुकासानग्रस्त शेतपिकांची पाहणी केली आहे. शेतकऱ्यांप्रती मुख्यमंत्र्यांची असलेली संवेदनशीलता आणि पालकमंत्री म्हणुन दादा भुसे यांनी दाखवलेली जागरूकता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे.मात्र ज्या तत्परतेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानीची दखल घेतली आहे. त्याच तत्परतेने बळीराजाला मदत झाली पाहिजे अशी जनभावना व्यक्त होत आहे.
काल शिवसेना शिंदे गटाचे बहुतांश मंत्री, आमदार, खासदार, हे आयोध्या मध्ये रामजन्मभूमी ठिकाणी गेले असताना राज्यात अचानक झालेल्या अवकाळी मुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी हे पर्यटन करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. याला सडेतोड उत्तर देत आज शिवसेनेचे सर्वच मंत्री व पालकमंत्र्यांनी आज आपापल्या जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीची पाहणी केली. मात्र या सर्वात सरस ठरले ते जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, मंत्री भुसेनी थेट जिल्ह्यात मुख्यमंत्री महोदयांना आणत राज्यातील सताधारी गटातील प्रमुख मंत्र्यांपैकी एक असल्याचे सिद्ध केले आहे.काल दिवसभर आयोध्या नगरीत मुख्यमंत्री शिंदे बरोबर असलेले दादा भुसे यांना कसमादे मध्ये झालेल्या नुकसानीचा अधिकारी, कार्यकर्ते, यांच्याकडून मिळालेला अहवाल आणि माहीती याचा आधार घेत मंत्री दादा भुसे यांनी तात्काळ दाखवलेली जागरूकता ..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट बागलाणच्या शेतकऱ्यांच्या बांधावर आणण्यासाठी उपयोगी ठरली. दादा भुसे यांचे कसमादे वर असलेल प्रेम आणि जिव्हाळा या निमित्ताने दिसुन आले. अवकाळीने झोडपल्यानंतर मुख्यमंत्री थेट शेतकऱ्याच्या बांधावर बागलाण मध्ये आल्याचा हा बहुधा पहिलाच प्रसंग आहे. पालकमंत्री असलेले दादा भुसे यांनी नुकतेच आठवडा भरापुर्वी डांगसौंदाणे उपबाजार समितीचे उदघाटन केले होते. यावेळी यापुढे मालेगाव प्रमाणे बागलाण मधील गाव खेड्यांचा विकास करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली होती . काल परवा झालेली मोसम खोऱ्यातील गारपीट ही बळीराजाचे कंबरडे मोडणारी होती.
यातुन दिलासा देण्यासाठी भुसेंनी थेट मुख्यमंत्र्याना शेताच्या बांधावर आणत आपले पालकत्व निभावले खरे.. बळीराजाची व्यथा ही दाखवली मात्र बळीराजाचे संकट पाहण्यासाठी आलेले मुख्यमंत्रीचा दौरा संपतो ना संपतो तोच आरम खोऱ्यावर आस्मानी संकटाने घाला घालत शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. मुख्यमंत्री मुबंई पोहचायचा आत झालेला हा वादळी पाऊस आणि नुकसान याचा रिपोर्ट अधिकारीआणि भुसे समर्थकांकडून नक्कीच पोहचला असेल मात्र बळीराजाचे झालेलं आर्थिक नुकसान न भरून येणारे आहे .सरकारची सहानुभूती जरी बरोबर असली तरी दोन पैसे कष्टाचे मिळतील या आशेने काम करणारा बळीराजा अवकाळीने मात्र जमीनदोस्त झाला आहे.
CM Eknath Shinde Satana Tour GM Dada Bhuse Politics