गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘स्वामी नारायण यांच्या आशिर्वादामुळेच आज मी मुख्यमंत्री’, एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती

by India Darpan
सप्टेंबर 28, 2022 | 1:08 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220928 WA0007

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बी.एस.पी.एस. स्वामीनारायण सांप्रदाय हा आपल्या १५० पेक्षा अधिक सेवाभावी, विधायक उपक्रमांच्या माध्यमातून जगभर कार्यरत आहे. त्याग भावनेतून भारतीयांचे विचार आणि संस्कृतीला या सांप्रदायामुळे वैश्विक आयाम लाभला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

येथील बोचासनवासी अक्षर पुरूषोत्तम स्वामीनारायण संस्था (बी.ए.पी.एस.) मंदिराच्या वेदोक्त मुर्तीप्रतिष्ठाविधी समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भु्से, खासदार हेमंत गोडसे, खासदार राहुल शेवाळे, आमदार सिमा हिरे, राहुल ढिकले, सुहास कांदे, स्वामीनारायण संस्थेचे परम पूज्य महंत स्वामी महाराज, सद्गुरू संत कोठारी बाबा (भक्तिप्रियदास), विवेक सागर महाराज उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि गोदावरीच्या पवित्र तीरावर साकारलेले हे स्वामीनारायण मंदीर म्हणजे नाशिक शहराच्या सौंदर्यात भर घालणारे आणि जगभरातून येथे येणाऱ्या तीर्थयात्री, पर्यटक यांच्यासाठी अभिनव व अध्यात्मिक आकर्षणाचे प्रमुख केंद्र झाले आहे. १९ ४३ साली ब्रह्मस्वरूप प्रमुख स्वामी महाराजांनी नाशिकच्या गोदातिरी भव्य मंदीर उभारणीचा संकल्प केला होता. तो संकल्प आज या मंदिराच्या रूपाने सत्यात प्रकटला आहे. हे मंदीर स्वामीनारायण यांच्या विचारातून साकारलेल्या कलाकृतींपैकी एक सुंदर नमुना आहे, तसेच अशा अध्यात्मिक वास्तू, सेवा व त्यागांच्या विचारांतून समाजाला जोडण्याचे काम स्वामीनारायण सांप्रदायाच्या माध्यमातून जगभर केले जात आहे, असेही यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.

राज्यात गेल्या अडीच महिन्यांपासून जनतेच्या मनातले सरकार स्थापन झाले असून ते जनतेची सेवा, विकासासाठी अहोरात्र कार्य करते आहे. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आशीर्वाद व प्रेरणा सरकारच्या पाठीशी आहेत. त्यामुळे सेवा, विकासाचे ध्येय गाठण्यासाठी,लोकोपयोगी योजनांच्या आखणीसाठी, सुख-शांतीसाठी प्रसंगी स्वामीनारायण सांप्रदायाच्या आचार,विचार आणि कृतीची जोड सरकारच्या कार्याला दिली जाईल, असेही यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

शिलान्यास ते मुर्तीप्रतिष्ठा हा मला लाभलेला आशीर्वाद
यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी या मंदिराच्या शिलान्यास व भूमीपूजनासाठी मी ११ नोव्हेंबर, २०१७ ला राज्याचा कॅबिनेट मंत्री या नात्याने उपस्थित होतो. आज याच मंदिराच्या वेदोक्त मुर्तीप्रतिष्ठा विधीस मी मुख्यमंत्री म्हणून उपस्थित आहे, हे माझे भाग्य तर आहेच त्याचबरोबर अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण महाराज यांचा तो मला लाभलेला आशीर्वादच आहे, असे सांगून दोन वर्षे कोरोनाचे निर्बंध असतानाही अवघ्या तीन वर्षात हे मंदिर उभारून महाराष्ट्राला एक अनोखे मंदिरशिल्प दिल्याबद्दल त्यांनी बा.एस.पी.एस. स्वामीनारायण संस्थेबद्दल गौरवोद्गार काढले.

यावेळी परम् पूज्य महंत स्वामी महाराज यांनी आपल्या मनोगतातून देशात सुख-शांती कायम असेल तरच विकास साधला जाईल, देश पुढे जाईल, त्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी बी. ए. पी.एस. स्वामीनारायण संस्थेच्या वतीने स्वामी निलकंठवर्णी महाराज यांची धातू प्रतिमा, पुस्तके देवून सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संपूर्ण मंदिराची पाहणी करून दर्शन घेतले.

CM Eknath Shinde on Swami Narayan Maharaj

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या कारणावरुन महेंद्रसिंग धोनी आणि गौतम गंभीर यांच्यात सुरूय शीतयुद्ध

Next Post

लम्पी आजारामुळे जनावरांचे सर्वाधिक मृत्यू या जिल्ह्यात

India Darpan

Next Post
lampi skin

लम्पी आजारामुळे जनावरांचे सर्वाधिक मृत्यू या जिल्ह्यात

ताज्या बातम्या

Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011