मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरण हे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या भोवती फिरत असताना आता या प्रकरणाला आणखी वेगळे आणि धक्कादायक वळण लागण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणात आता तत्कालिन केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव घेतले जात आहे. त्यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे. आता यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
सध्या शिवसेनेची प्रवक्ते असलेले खासदार संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी ईडीच्या ताब्यात असून आता न्यायालयीन कोठडीत आहेत. तब्बल १ हजार कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात शरद पवार यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया सावध प्रतिक्रीया दिली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शरद पवार हेच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला असून भातखळकर यांनी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. शरद पवार हेच पत्राचाळ प्रकरणाचे रिंग मास्टर असून त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
पवार केंद्रीय कृषीमंत्री असताना यशवंतराव चव्हाण सेंटर येथे म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत राऊत यांच्या उपस्थितीत पत्राचाळ संदर्भात बैठका झाल्या, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. त्यावेळेचे मुख्यमंत्री विलासराव देशमुखही या बैठकींना उपस्थित असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे भातखळकर यांच्या मागणीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना या संदर्भात विचारले असता त्यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया देताना अप्रत्यक्षपणे या मागणीला पाठींबा दिला आहे.
या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, त्याची मी माहिती घेतो. मला माहिती घेऊ द्या. त्यानंतर मी नक्की बोलेन, असे ते म्हणाले. त्यानंतर पुन्हा पत्रकारांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या बद्दलही प्रश्न विचारला. यावर ते म्हणाले, मी त्या बाबतीत माहिती घेऊन नक्कीच आपणाशी सविस्तर बोलेन, असे उत्तर दिले आहे.
CM Eknath Shinde on Patra Chawl Scam Sharad Pawar Enquiry
BJP Demand
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD