नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले असून यावेळी राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., नाशिक शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, महापालिका आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार,पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, निफाड प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पठारे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत केले.
मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शहर परिसरात विविध कार्यक्रम होत आहेत. नाशिकरोड येथे सारथी कार्यालयाचे उदघाटन त्यांच्या हस्ते केले जाणार आहे. त्यानंतर नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. आज दुपारी ते बाळासाहेबांची शिवसेना या पक्ष कार्यालयाचे उदघाटन करणार आहेत. कालिदास कलामंदिरातील पुरस्कार सोहळ्याला ते हजेरी लावणार आहेत. त्यानंतर दुपारुन ते मुंबईकडे जाणार आहेत.
CM Eknath Shinde Nashik Tour Started