मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी एका चिमुकल्याची सध्या खुप चर्चा होत आहे. या चिमुकल्याचे नाव आहे गणेश माळी. तो नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील असलोद येथील रहिवासी आहे. मुख्यमंत्र्यांनी गणेशची भेट घेतली. आणि त्याचे तोंडभरुन कौतुक केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अनंत आमची ध्येयासक्ती
अनंत अन आशा
किनारा तुला पामराला..
कवी कुसुमाग्रज्यांच्या या ओळी मला आठवल्या कारण नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील असलोद येथील तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या गणेश माळी या चिमुकल्याने काल वर्षा या निवासस्थानी येऊन माझी भेट घेतली. हा चिमुकला दोन्ही हातांनी दिव्यांग आहे. त्याला भेटून त्याची शिक्षणाप्रती आवड आणि जिद्द बघायला मिळाली. पायाच्या बोटात पेन धरून तो जिद्दीने लिखाण करतो. तसेच जेवणे, कपडे परिधान हेही काम गणेश पायांनी करतो अशी माहिती गणेशचे वडील विलास माळी यांनी मला दिली. यावेळी गणेशच्या या जिद्दीचे कौतुक करून त्याला त्याच्या उपचारासाठी ५ लाख रुपयांचा धनादेश दिला, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.