बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सत्तारांच्या वक्तव्यांनी शिंदे गट अडचणीत; एकनाथ शिंदेंनी सत्तारांची अशी केली कानउघाडणी

नोव्हेंबर 8, 2022 | 12:20 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
abdul sattar e1658747385510

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सत्तार यांच्या विधानावरुन राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. राज्यभरात अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात राज्यभरात सत्तारांविरोधीत राष्ट्रवादीकडून आंदोलन होत आहे. परिणामी, शिंदे गट चांगलाच अडचणीत आला आहे. याची गंभीर दखल शिंदे गटाचे प्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी सत्तारांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

विरोधकांकडून शिंदे गटातील आमदारांवर सतत खोके घेतल्याची टीका केली जाते. यावरुन अब्दुल सत्तार म्हणाले की, ‘आमच्यावर खोके म्हणणाऱ्या लोकं भिकार## आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांच्याबद्दलही सत्तार यांनी अशाच प्रकारचा उल्लेख केला. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राष्ट्रवादीचे समर्थक आक्रमक झाले असून, सत्तारांच्या माफीची मागणी करत आहेत.” अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त विधानामुळे शिंदे गटही अडचणीत आला आहे. अब्दुल सत्तारांच्या विधानाची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन करुन चांगलीच कानउघडणी केल्याचे समजते. यापुढे अशी वादग्रस्त विधाने करु नका, असंही एकनाथ शिंदेंनी अब्दुल सत्तारांना बजवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या मुंबई आणि औरंगाबादमधील बंगल्यावर दगडफेकही केली. तसेच या विनाधप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांची २४ तासात मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही राष्ट्रवादीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन केली आहे.
राज्यात राष्ट्रवादीकडून ठिकठिकाणी होणारे आंदोलन आणि शिंदे गटाची होणारी बदनामी लक्षात घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने सत्तारांना फोन केला. आणि या सर्व विषयावर त्यांनी सत्तारांना चांगलीच समज दिली आहे. आपण कुठले आणि काय वक्तव्य करीत आहोत, कुणाविषयी करीत आहोत, याचे भान ठेवावे याची जाणीवकही कडक शब्दात शिंदेंनी करुन दिल्याचे सांगितले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी अब्दूल सत्तार यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर आंदोलन केलं. यावेळी आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पोलीस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये धरपकड झाली. काही कार्यकर्त्यांनी बंगल्यावर दगडफेक करत काच्या फोडल्या आहेत.

प्रकरण चिघळताच मागितली माफी
सुप्रिया सुळे यांच्याबद्दलच्या वापरलेले आक्षेपार्ह शब्द मागे घेत अब्दुल सत्तार यांनी माफी मागितली. मी कोणत्याही महिला भगिनींच्या बाबतीत अपशब्द बोललो नाही. खासदार सुप्रिया सुळे किंवा कोणत्याच महिलेबद्दल मी काहीच बोललो नाही. माझ्या बोलण्याने जर कोणाची मने दुखावली असतील, तर मी खेद व्यक्त करतो आणि शब्द मागे घेतो, सॉरी म्हणतो, असे सत्तार म्हणाले.

CM Eknath Shinde Minister Abdul Sattar Controversial Statement

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अनिल परब यांच्या अडचणी वाढल्या; याप्रकरणी गुन्हा दाखल

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट; पुष्पगुच्छाद्वारे दिल्या शुभेच्छा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
FhBbN8oaMAIzLCf e1667890703591

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट; पुष्पगुच्छाद्वारे दिल्या शुभेच्छा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011