लखनऊ (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनऊ येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री श्री. शिंदे दोन दिवसीय उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून आज रात्री त्यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी योगी आदित्यनाथ यांना शाल, पुष्पगुच्छ तसेच ‘श्री गणेशाची’ मूर्ती भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दोन दिवसीय दौऱ्याचे अनुभव सांगितले. तसेच, अयोध्येत होत असलेल्या विकासकामांचे कौतुक केले. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या सन्मानार्थ रात्री भोजन आयोजित केले. याप्रसंगी राज्याचे मंत्री तसेच आमदार, खासदार उपस्थित होते.
#उत्तर_प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री श्री.@myogiadityanath जी यांनी दिलेले स्नेहभोजनाचे निमंत्रण स्वीकारून आज त्यांच्या लखनऊ येथील शासकीय निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. #अयोध्या दौऱ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. pic.twitter.com/FhaK4oQliE
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 9, 2023
CM Eknath Shinde Meet UP Cm Yogi Adityanath