रविवार, ऑक्टोबर 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

जळगाव जिल्ह्याला मुख्यमंत्र्यांनी दिला हा शब्द; कोट्यवधी रुपयांच्या या विकासकामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण

फेब्रुवारी 17, 2023 | 11:38 am
in राज्य
0
ण 2

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोकर, ता. जळगाव येथील कार्यक्रमात सांगितले. जळगाव जिल्ह्यातील निम्न तापी प्रकल्पातील भोकर येथे तापी नदीवरील 150 कोटी रुपयांच्या उंच पुलाचे भूमिपूजन कोनशिला अनावरण करुन व जिल्ह्यातील 270 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार सर्वश्री. संजय सावकारे, किशोर पाटील, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, चंद्रकांत पाटील, लता सोनवणे, माजी आमदार स्म‍िता वाघ, चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी- कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानून राज्य शासन काम करीत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या काही योजना, प्रकल्प आवश्यक आहेत. त्यांना तत्काळ मंजुरी देण्यात येत आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर खेत पाणी, हर घर जल या योजनांवर राज्य शासन प्रामुख्याने लक्ष देत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता राज्य शासनाने राज्यातील 22 जलसिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून यामुळे राज्यातील 5 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल उपसा सिंचन योजनेला 100 कोटी व निम्न तापी प्रकल्पाला 100 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

त्याचबरोबर निम्न तापी प्रकल्पाचा तापी नदीवरील या पुलामुळे 70 किमी वळसा वाचणार आहेत. त्यामुळे हा पूल सर्वांसाठी वरदान ठरणारा आहे. हर घर नल, जलजीवन मिशन अंतर्गत राज्यात 38 हजार गावात कामे सुरु आहेत. जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळावी याकरिता अमरावतीच्या धर्तीवर जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यासाठी एमआयडीसीचे विभागीय कार्यालय जळगाव येथे सुरु करण्यासाठी बैठक घेण्यात येईल. तसेच मुक्ताईनगर, धरणगाव, चोपडा, पाचोरा, एरंडोल येथे एमआयडीसी सुरु करण्यात येईल. जळगाव जिल्ह्यात वारकरी भवन व लोककला भवन उभारण्यासाठी सकारात्मक विचार करु शिवाय जिल्ह्यातील वाहतुकीसाठी 100 बसेस, पाळधी येथे बालकवी ठोंबरे स्मारक, बहिणाबाई चौधरी स्मारक, धरणगाव येथे उपजिल्हा रुग्णालय व नशीराबाद येथे ग्रामीण रुग्णालय मंजुरीबाबत आणि केळीचा पोषण आहारात समावेश करण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

यावेळी बोलतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यांसह दोन राज्यांना जोडणाऱ्या या पुलाचे स्वप्न आज पूर्ण होत आहे याचा विशेष आनंद आहे. जलजीवन मिशन अतंर्गत राज्यातील 38 हजार गावांमध्ये कामे सुरु असून या कामांच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यात येत आहे. केळीचा पोषण आहारात समावेश करावा. केळी प्रक्रिया उद्योग सुरु करावा. टोकरेकोळी समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे, कापसाला हमी भाव देण्याची मागणीही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली.

ग्रामविकास मंत्री श्री. महाजन म्हणाले की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहेत. जळगावात मेडिकल हबचे काम सुरु होत आहे. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी पाडळसे प्रकल्पाचा बळीराजा योजनेत समावेश करुन काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली.

या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण
* भोकर, ता. जि. जळगाव येथे तापी नदीवरील उंच पुल व जोड रस्त्याचे भूमिपूजन (रु. 150 कोटी)
* शिवाजी नगर येथील कि.मी. 420/9/11 वरील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण- रु. 25 कोटी.
* मोहाडी (जळगाव) येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालयांचे बांधकाम करणे- रु.75 कोटी 31 लाख.
* म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजन रु. 35 कोटी.
* जळगाव म.न.पा. हद्दीतील व वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन – रु. 42 कोटी.

* बांभोरी येथील गिरणा नदीवरील मोठया पुलाचे बांधकाम-रु. 40 कोटी.
* धरणगाव तालुक्यात विविध ठिकाणी रस्ते डांबरीकरण व पुलाचे बांधकाम-रु. 57 कोटी.
* जळगाव व धरणगांव तालुक्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र विकास कामे- रु. 25 कोटी.
* जळगाव येथे धर्मादाय आयुक्त कार्यालय इमारत बांधकाम-रु. 4 कोटी.
* धरणगाव येथे पशुसंवर्धन दवाखाना इमारत बांधकाम-रु. 4 कोटी.

https://twitter.com/mieknathshinde/status/1626182966643924994?s=20

CM Eknath Shinde Jalgaon Development Projects

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या कारणासाठी मंत्री डॉ. भारती पवार यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट; कळवण तालुक्यातील हा प्रश्न मिटला

Next Post

डी फार्मसी प्रवेशाच्या बहाण्याने विद्यार्थ्याची दीड लाखाची फसवणूक… एकाला अटक… येवला पोलिसांची बंगळुरूत कारवाई

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा दिवस… जाणून घ्या, १९ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 18, 2025
IMG 20251018 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सामन्यात… महाराष्ट्राचा सौराष्ट्र वर १० गडी राखून दणदणीत विजय…

ऑक्टोबर 18, 2025
tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर घरबसल्या खरेदी करा सोने आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे बक्षिस….

ऑक्टोबर 17, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरातील २८ ठिकाणची एकत्रित पार्किंग निविदा वादात…

ऑक्टोबर 17, 2025
organ donation
महत्त्वाच्या बातम्या

भावनिक क्षण… आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण…

ऑक्टोबर 17, 2025
IMG 20251017 WA0049
मुख्य बातमी

ओझर येथील कार्यक्रमात ‘तेजस’ लढाऊ विमानासह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित…

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
IMG 20230217 WA0092 1 e1676615195467

डी फार्मसी प्रवेशाच्या बहाण्याने विद्यार्थ्याची दीड लाखाची फसवणूक... एकाला अटक... येवला पोलिसांची बंगळुरूत कारवाई

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011