नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. दोघांचेही मध्यरात्रीच दिल्लीत आगमन झाले. मंत्रिमंडळ विस्ताराची बोलणी करण्यासाठीच ते दिल्लीत आल्याचे सांगितले जात आहे. भाजप पक्षश्रेष्ठींची ते आज भेट घेणार आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी त्यांच्या भेटीगाठी आज होणार आहेत. तसेच, नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांचेही अभिनंदन दोघे करणार असल्याचे सांगितले जात आहे.
फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळेही या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेना विरुद्ध बंडखोर शिंदे गट यांच्यातील वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. न्यायालयात पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी होणार आहे. मात्र, न्यायालयाने मंत्रिमंडळ विस्तार करण्यास कुठेलही निर्बंध ठेवलेले नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने आज अंतिम बोलणी करुन उद्याच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हे आहेत. उद्या भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक पनवेलमध्ये होत आहे. तरीही मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले जात आहे.
CM Eknath Shinde DYCM Devendra Fadanvis Delhi Tour Cabinet Expansion