नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पक्षाला सोबत घेत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता त्यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत. पूर्वी काँग्रेस पक्षाचे अनेक निर्णय मुंबईत नव्हे तर दिल्लीत घेतले जातात, असा आरोप केल्या जात असे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी किंवा हायकमांड ठरवेल तीच पूर्व दिशा असे काँग्रेसच्या संदर्भात नेहमीच बोलले जात असे. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मध्यरात्री दिल्लीवारी केली.
आता राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर शिंदे – फडणवीस या जोडगोळीचे सरकार आले आहे. परंतु त्यावर भाजपच्या दिल्लीतील पक्ष श्रेष्ठीचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक निर्णय दिल्लीतच होतात, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत. काल शुक्रवारी देखील त्यांनी दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली. यासंदर्भात पत्रकारांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. त्यावेळी मी कोणाला घाबरत नाही ! असे उत्तर त्यांनी दिल्याचे समजते.
मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे काल तिसऱ्यांदा दिल्लीत दाखल झाले. त्यांनी दिल्लीत अनेक बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. राज्यातला रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? असा सवाल विरोधकांकडून रोज त्यांना विचारण्यात येत आहे. यावर त्यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या भेटीनंतर मी कुणाला घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे, तर आता या भेटीनंतर तरी मंत्रिमंडळ विस्ताराला नवा मुहूर्त मिळून राज्याला नवे मंत्रिमंडळ होणार का? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
दिल्लीतील भेटीबाबत एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, राष्ट्रपतींच्या विजयानंतर आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी जेवण ठेवले होते. त्या ठिकाणी सर्वच भेटले. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असेही त्यांनी सांगितले तसेच सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीसाठी थांबला आहात का असे विचारले असात, असे काहीच नाही, सुप्रीम कोर्टाने असे काही सांगितलेले नाही. सुप्रीम कोर्टाचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काही संबंध नाही आणि कुठल्याही कामकाजावर देखील सुप्रीम कोर्टाने स्टे दिलेला नाही. त्यामुळे तो विषय नाही, आम्ही लवकरात मंत्रिमंडळाचा विस्तार करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असेही सांगितले आहे. तसेच यादीवर चर्चा करायची असतील तर मुंबईत होईल ती दिल्लीत कशाला होईल, असेही शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे यांना त्यांच्या सुरक्षेबाबत विचारले असता ते म्हणाले की, त्यावेळेस नक्षलवाद्यांच्या धमक्या येत होत्या. नक्षलग्रस्त भागामध्ये म्हणजेगडचिरोलीमध्ये मी गेले अडीच वर्षे पालकमंत्री म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर विकासाची काम केली आहेत, त्यामुळे मी कशालाही घाबरत नाही. तसेच सुरक्षा हा गृह खात्याचा विषय आहे, मला त्याच्यावर काही भाष्य करायचे नाही, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीहून काल रात्री अडीच वाजता मुंबईत पोहचले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत गेले होते. दोघांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राष्ट्रपती निवडणुका नंतर पंतप्रधान यांनी डीनरचे आयोजन केले होते त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहभागी झाले होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे दिल्लीहून मुंबईत परत्यावर आता मंत्री मंडळाचा विस्तार कधी होणार याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्याच अनुशंगाने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले होते. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार लवकर होण्याची शक्यता आहे.
त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विस्ताराबाबत विचारलं असता, ‘अजून तारीख ठरलेली नाही, पण मला असे वाटते की, आता लवकरात लवकर हा विस्तार होईल. त्याबाबतच्या घडामोडी आमच्या चाललेल्या आहेत, त्यामुळे लवकरच विस्तार करु. सुप्रीम कोर्टचा याच्याशी काही संबंध नाही. उलट सुप्रीम कोर्टात आमची केस अतिशय मजबूत आहे. त्याचा आणि याचा काही संबंध नाही’, असेही फडणवीस म्हणाले. विशेष म्हणजे काल फडणवीस यांचा वाढदिवस सुद्धा होता.
एकनाथ शिंदे यांनी ३० जूनला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊनही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. न्यायालयातील अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणी हे यामागचे मोठे कारण असल्याचे मानण्यात येत आहे. मात्र आता याबाबत काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार आहे. दि. २५ जुलैला नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्द्ल अद्याप संभ्रमाचे वातावरण कायम आहे.
CM Eknath Shinde DYCM Devendra Fadanvis Delhi Tour Cabinet Expansion