मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्धव ठाकरे गटातील जवळपास ५० पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेनामध्ये प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा मुंबईत झाला. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेश सोहळ्याला खासदार हेमंत गोडसे, सचिव भाऊ चौधरी, महानगरप्रमुख प्रविण तिदमे, नाशकातील माजी विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते उपस्थित होते. या प्रवेश सोहळ्याच्या प्रारंभीच एकनाथ शिंदे यांनी खासदार गोडसे यांचे नाव घेतले. त्यानंतर सचिव चौधरी यांचे नाव घेतले. मात्र, त्यांच्या गटाचे नाशिकमध्ये महानगरप्रमुख कोण हेच त्यांना माहित नसावे असे दिसून येत आहे. त्यामुळेच त्यांना महानगरप्रमुख प्रविण तिदमे यांचे नाव अन्य पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. कुणी प्रवीण तिदमे सांगत होते तर कुणी बंटी तिदमे. अखेर शिंदे यांनी हा नावांचा सोपस्कार बाजूला ठेवत पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. बघा, यावेळी नेमके काय घडले त्याचा हा व्हिडिओ
https://twitter.com/mieknathshinde/status/1611239891471568902?s=20&t=FjZFO_GKgdsnyeeT6qjX5w
CM Eknath Shinde Don’t know Nashik Mahanagarpramukh