मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाची तातडीने बैठक बोलावली आहे. वर्षा निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अचानक बोलावलेल्या या बैठकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या बैठकीत काय निर्णय होणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
सध्या संपूर्ण राज्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाकडे लक्ष लागले आहे, या निवडणुका कोणत्याही क्षणी होऊ शकतात. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारी लागली आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री विशेषतः शिवसेनेचा शिंदे गट आपल्याला सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळवा, यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने वर्षा बंगल्यावर शिंदे गटाची बैठक बोलावली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाला केली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने ९२ नगर परिषदा व ४ नगर पंचायतींमधील निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलला. या संदर्भात शिंदे सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्यास परवानगी देण्याची विनंती केली होती. याबाबत सर्वोच्च न्यायालयात न्या. अजय खानविलकर, न्या. अभय ओक आणि न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला इशारा दिला. ‘निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे राज्य निवडणूक आयोगाला बंधनकारक आहे.
आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या घडामोडींना आतापासून सुरुवात देखील झालीय. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या सर्व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही बैठक बोलावण्यात आली असून संबंधित बैठक सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी महापालिका निवडणुका, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी ही महत्त्वाची बैठक मानली जाते. मुख्यमंत्री हे आपल्या नेत्या आणि कार्यकर्ते यांना जबाबदारी वाटून देण्याची शक्यता आहे. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय-काय गोष्टी करायला पाहिजेत, याबाबत रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे.
या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर कॅबिनेट मंत्री उदय सामंत, तसेच शिंदे गटाचे नेते भरत गोगावले, किरण पावसकर यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत पक्षासंदर्भात देखील महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनादेखील शिंदे गट जोरदार झटका देण्याच्या तयारीत आहे. युवासेनेचे काही पदाधिकारी शिंदे गटात जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यातच युवासेना महाराष्ट्र प्रदेश सहसचिव शर्मिला येवले यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. विशेष म्हणजे शर्मिला येवले यांनी घेत सांगितले होते की, आम्हाला ठाकरे गटामध्ये कामासाठी संधी मिळत नाही. त्यामुळे येवले या लवकरच शिंदे गटात पक्षप्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे.
CM Eknath Shinde Call Shinde Group Meeting