मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे. शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता पंतप्रधान म्हणून थेट देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले आहे. फडणवीस हे सध्या शिंदे यांच्याच सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. येथे पोलिस वसाहतीच्या उद्घाटनप्रसंगी भाषण करतांना शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख पंतप्रधान असा केला. ही बाब त्यांना लक्षात येताच त्यांनी सारवासारव केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असे नाव घेतले. शिंदे यांचे हे वक्तव्य सध्या प्रचंड चर्चेत आहेत. बघा त्याचा हा व्हिडिओ….
CM Eknath Shinde Call Devende Fadanvis as a Prime Minister Video