मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज उद्धव यांचा वाढदिवस असल्याने शिंदे यांनी आज सकाळीच ट्विट केले आहे. शिंदे या ट्विटमध्ये म्हणतात की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना…
विशेष म्हणजे शिंदे यांनी उद्धव यांच्या नावापूर्वी शिवसेना पक्ष प्रमुख असा केलेला नाही. शिवसेनेत बंड केल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी उद्धव यांचे नाव माजी मुख्यमंत्री असे घेतले आहे. त्यामुळे शिंदे हे उद्धव यांना शिवसेना पक्ष प्रमुखही मानत नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या ट्विटची सर्वत्र चर्चा होत आहे. तसेच, शिवसेना पक्ष प्रमुख होण्याचे शिंदे यांचे स्वप्न असल्याचेही यातून स्पष्ट होत आहे. कारण, शिंदे यांनी सेनेचे सर्वप्रथम ४० आमदार फोडले. त्यानंतर आता १२ खासदारही फोडले आहेत. परिणामी, विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे गटनेते पद गेले आहे. शिवाय शिंदे यांनी थेट निवडणूक आयोगाकडेच धनुष्यबाण या शिवसेनेच्या चिन्हाची मागणी केली आहे. त्यामुळे त्यांच्या कृतीनंतर आता शुभेच्छांद्वारेही सारे काही स्पष्ट होत असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना….
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 27, 2022
Shivsena Rebel CM Eknath Shinde Birthday Wishes to Shivsena Chief Uddhav Thackeray