नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे हे चौथ्यांदा दिल्लीत आले आहेत. श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आणि भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून त्या पदावर विराजमान झाल्या. यासाठी त्यांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या.
सत्ता स्थापन झाल्यानंतर सर्वप्रथम ते भाजपश्रेष्ठींसह पंतप्रधान व राष्ट्रपतींचे आशिर्वाद घेण्यासाठी आले होते. त्यानंतर ते मंत्रिमंडळ विस्तार, ओबीसी आरक्षण सुनावणी आणि शिवसेनेच्या १२ खासदारांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यानंतर राष्ट्रपती पदाची निवडणूक झाल्यानंतर पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभाला आले होते. तर, आज श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज देशाच्या १५व्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली या समारंभास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
https://twitter.com/MahaGovtMic/status/1551450671115030529?s=20&t=17DnIzX7P3-Kr57LTldEFA
‘भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राष्ट्रपती पदावर विराजमान झालेल्या श्रीमती मुर्मू या पदाची शान आणखी वृद्धिंगत करतील. त्यांच्यामुळे भारताचा गौरव जागतिक स्तरावर आणखी उ़ंचावेल, असा सार्थ विश्वास आहे. त्यांच्या कारकिर्दीला आदरपूर्वक शुभेच्छा,’ असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज नवनियुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथ ग्रहण समारंभाचे आयोजन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांनी राष्ट्रपती महोदयांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या समारंभास माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री व राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदि मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समारंभास उपस्थित होते.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1551479576811159552?s=20&t=17DnIzX7P3-Kr57LTldEFA
CM Eknath Shinde And DYCM Devendra Fadanvis Delhi Tour Today