रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला राजीनामा…देवेंद्र फडणवीस, अजित पवारही उपस्थितीत

by India Darpan
नोव्हेंबर 26, 2024 | 11:48 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 63


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून त्यात आता मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मंगळवारी राज्यापालांना सुपूर्द केला. यावेळी राज्यपालांनी शपथविधीपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम बघण्याच्या सूचना केली. राज्याच्या विधानसभेची मुदत ही २६ नोव्हेंबर पर्यंत होती. ती आता संपल्याने मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळे हा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थितीत होते.

या निवडणुकीत महायुतीला २३० जागा मिळाल्या असून त्यात भाजप १३२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला ५७ तर अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या आहे. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने त्यासाठी आपलाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

या सरकारमध्ये शिंदे गट व अजित पवार गटाला उपमुख्यमंत्रीपद मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला अजित पवार गटाचा पाठींबा असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव मागे पडले आहे. शिंदे गटाला पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळेल ही आशा अजूनही आहे. पण, भाजपने आपलाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय जवळपास घेतला आहे. त्यावर आता शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

आता या नव्या सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा फॅार्म्युलावर चर्चा सुरु झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार भाजपला सर्वाधिक २१ मंत्रिपदे मिळू शकेल. तर शिवसेना शिंदे गटाला १२ व राष्ट्रवादी अजित पवार गटाला १० मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. सहा ते सात आमदारांच्या मागे एक मंत्रिपद असे ठरले असल्याचीही चर्चा आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केले आहे. महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिल्लीत मुख्यमंत्रीपदाचे नाव ठरले…अमित शाह मुंबईत करणार घोषणा

Next Post

दिंडोरीचे तालुका वैद्यकिय अधिकारी २० हजाराची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

Next Post
Corruption Bribe Lach ACB

दिंडोरीचे तालुका वैद्यकिय अधिकारी २० हजाराची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

ताज्या बातम्या

trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011