रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देणार…

by India Darpan
नोव्हेंबर 26, 2024 | 12:23 am
in मुख्य बातमी
0
CM Eknath Shinde 01

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून त्यात आता मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मंगळवारी सकाळी ११ वाजता लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत देणार आहे.

राज्याच्या विधानसभेची मुदत ही २६ नोव्हेंबर पर्यंत होती. ती आता संपल्याने मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळे एकनाथ शिंदे हे मंगळवारी राजीनामा देणार असल्याचेही बोलले जात आहे.

या निवडणुकीत महायुतीला २३० जागा मिळाल्या असून त्यात भाजप १३२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला ५७ तर अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या आहे. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने त्यासाठी आपलाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

या सरकारमध्ये शिंदे गट व अजित पवार गटाला उपमुख्यमंत्रीपद मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला अजित पवार गटाचा पाठींबा असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव मागे पडले आहे. शिंदे गटाला पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळेल ही आशा अजूनही आहे. पण, भाजपने आपलाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय जवळपास घेतला आहे. त्यावर आता शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

आता या नव्या सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा फॅार्म्युलावर चर्चा सुरु झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार भाजपला सर्वाधिक २१ मंत्रिपदे मिळू शकेल. तर शिवसेना शिंदे गटाला १२ व राष्ट्रवादी अजित पवार गटाला १० मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. सहा ते सात आमदारांच्या मागे एक मंत्रिपद असे ठरले असल्याचीही चर्चा आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारतीय रेल्वेच्या तीन ‘मल्टीट्रॅकिंग’ प्रकल्पांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी… जळगाव-मनमाड चौथी मार्गिकाचा समावेश

Next Post

दिल्लीत मुख्यमंत्रीपदाचे नाव ठरले…अमित शाह मुंबईत करणार घोषणा

Next Post
amit shah11

दिल्लीत मुख्यमंत्रीपदाचे नाव ठरले…अमित शाह मुंबईत करणार घोषणा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011